Budh Gochar December 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. गोचर कुंडली (Gochar Kundali) ही सर्वसमावेश असते. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीत ग्रहाचं असलेलं स्थान आणि गोचर यानुसार फळ मिळत असतं. ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहांचा स्वत:चा असा स्वभाव आहे. त्या त्या स्वभावानुसार ग्रह आपल्या जातकांना फळ देतो. बुध ग्रह बुद्धी, व्यापार, धन आणि संवादाचा ग्रह आहे. ग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह 13 दिवसानंतर म्हणजेच 3 डिसेंबरला गोचर करणार आहे. गोचर कुंडलीनुसार बुध ग्रह धनु राशीत प्रवेश (Budh Grah Gochar) करणार आहेत. त्यानंतर 28 डिसेंबरला मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे पाच राशींना लाभ होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- बुध ग्रहाच्या गोचरामुळे मेष राशीच्या लाभ मिळणार आहे. करिअर आणि उद्योग व्यवसायात शुभ परिणाम मिळतील. या काळात केलेली गुंतवणून फलदायी ठरेल. तसेच धार्मिक कार्यात रुची वाढेल. तसेच समाजात मानसन्मान वाढेल. असं असलं तरी या काळात तब्येतीची काळजी घेणं आवश्यक आहे. 


वृषभ- बुध ग्रहाच्या गोचरानंतर नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. या काळात रखडलेली कामं मार्गी लागतील. मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. खर्चावर आळा बसणार असल्याने बचत वाढेल. या लांबच्या प्रवासाचा योग जुळून येईल. 


कर्क- बुध ग्रहाच्या गोचरामुळे नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच पगारवाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसापासून रखडलेली कामं मार्गी लागलतील. गुंतवणुकीतून अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता आहे. अचानकपणे पैसे मिळू शकतात. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल.


बातमी वाचा- मंदिरात गेल्यावर तुम्ही प्रदक्षिणा घालता! कोणत्या देवासाठी किती परिक्रमा, जाणून घ्या


सिंह- बुध गोचरामुळे सिंह राशीच्या लोकांना फायदा होईल. विशेषत: शेअर मार्केटशी संबंधित आहेत, त्यांना मोठा फायदा होईल. विद्यार्थ्यांना फायदा होईल. कुटुंबात होणारी भांडणं संपुष्टाता येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमची कामगिरी उत्कृष्ट राहील.


कन्या- बुध ग्रहाचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. नवीन घर किंवा कार खरेदी करण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो. सर्वतोपरी सहकार्य करून कामे पूर्ण होतील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)