Budh Gochar : राजकुमार बुधाचं गोचर ठरणार डोकेदुखी, `या` राशींवर धनहानीसह कोसळणार संकटांचा डोंगर
Budh Gochar : येत्या काळामध्ये बुध ग्रह गोचर करणार आहे. बुध ग्रह सप्टेंबरच्या सुरुवातीला स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या राशीबदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे.
Budh Gochar : ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर प्रत्येक ग्रह त्याचं स्थान बदलतो. यावेळी ग्रह त्याच्या राशीमध्ये बदल करतो. याला ग्रहांचं गोचर म्हटलं जातं. ज्यावेळी ग्रह गोचर करतात तेव्हा त्याचा परिणाम 12 राशींच्या व्यक्तींवर दिसून येतो. येत्या काळामध्ये बुध ग्रह गोचर करणार आहे.
ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आगामी काळात राशीत बदल करणार आहे. बुध ग्रह सप्टेंबरच्या सुरुवातीला स्वतःच्या राशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या राशीबदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. यावेळी काही राशीच्या लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलंय. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
वृषभ रास
बुधाचं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरणार आहे. यावेळी या राशीच्या व्यक्तींना करिअर आणि पैशांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यावेळी कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. कुटुंबात येणाऱ्या अडचणींमध्ये अचानक वाढ होणार आहे. कुटुंबातील काही व्यक्ती आजारी पडू शकतात. नवीन कामाचा विचार करू नये.
कर्क रास
बुध ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही वादाला सामोरं जावं लागू शकतं. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून देखील यश हाती लागणार नाही. कुटुंबातील सदस्यही तुमच्या पैशाचा दुरुपयोग करू शकतात. तुम्ही तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा.
मकर रास
मकर राशी ही शनीची राशी मानली जाते आणि बुधाशी शनीच्या अशुभ संबंधामुळे हे गोचर या राशीच्या लोकांसाठी अशुभ परिणाम देणारं ठरेल. नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्ही गाडी चालवत असाल तर तुम्हाला गाडी जास्त काळजी घ्यावी लागेल. या काळात त्यांनी केलेले सर्व प्रयत्न भविष्यात फायदेशीर ठरणार नाहीत. कोर्टाशी संबंधित कोणतेही प्रकरण चालू असेल तर त्यामध्ये यश मिळणार नाही.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )