Mercury Transit December 2022: 3 डिसेंबर 2022 रोजी धन, बुद्धी, व्यापार, संवाद कारक ग्रह बुध गोचर करणार आहे. बुध ग्रह देवगुरु बृहस्पतींच्या धनु राशीत प्रवेश करणार (Budh Gochar In Dhanu Rashi) आहे. बुधाच्या गोचरामुळे काही राशींसाठी अच्छे दिन येणार आहेत. आर्थिक स्थिती, उत्पन्न, बुद्धिमत्ता, संवाद यावर चांगला परिणाम दिसून येईल. बुध ग्रह धनु राशीत 29 डिसेंबर 2022 पर्यंत असणार आहे. त्यामुळे वृषभ (Vrushabh), कर्क (Kark), सिंह (Sinha), तूळ (Tula) आणि मकर (Makar) राशीला 26 दिवस फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात काय फळ मिळू शकते. 


पाच राशींना होणार फायदा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- बुध गोचर वृषभ राशीसाठी फलदायी ठरणार आहे. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. जोडीदाराची या काळात साथ मिळेल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. सरकारी क्षेत्रात लाभ मिळेल, अशी स्थिती आहे. लग्न ठरण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी हा उत्तम आहे. आर्थिक स्थितीही या काळात मजबूत होईल. 


कर्क- बुधाच्या राशी परिवर्तनामुळे कर्क राशीला फायदा होईल. विद्यार्थ्यांना या काळात लाभ मिळेल. जोडीदाराकडून साथ मिळेल. जे लोक लव्ह मॅरेज करू इच्छितात त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. संतान प्राप्तीचा योग देखील जुळून आला आहे. आपल्या योजना गुप्त ठेवून काम करा. धन लाभ होण्याची शक्यता आहे. 


सिंह- डिसेंबर महिना सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांची बचत करण्यात यशस्वी ठराल. अचानक काही मार्गातून पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. मालमत्तेशी निगडीत प्रकरणात यश मिळू शकतं. गाडी तसेच घर घेण्याचं स्वप्न या काळात पूर्ण होईल. या काळात चांगली बातमी मिळू शकते.


बातमी वाचा- Lal Kitab: आर्थिक अडचणीत आहात! लाल किताबमधील 'हे' चमत्कारीक तोडगे वापरा 


तूळ- बुध गोचराचा तूळ राशीला विशेष फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात झालेल्या व्यवहारातून पैसा खेळता राहील. वाणीच्या जोरावर कामं होतील. समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्याही वाढतील.


मकर- डिसेंबर महिन्यात ग्रहांची साथ मकर राशीला मिळणार आहे. काही किचकट प्रकरणात यश मिळेल. या काळात उत्पन्न वाढू शकते. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कोर्टकचेरीच्या कामात यश मिळेल. सरकारी कामात यश मिळेल. कुटुंबाकडून साथ मिळाल्याने या काळात उत्साह वाढेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)