Budh Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या वर्षाच्या शेवटी बुध ग्रह (Budh Gochar) मकर राशीत (Makar Rashi) गोचर करणार आहे. या वर्षातील शेवटचं गोचर असणार आहे. 28 डिसेंबरला बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. मकर राशीत सकाळी 4 वाजून 5 मिनिटंनी प्रवेश करेल. बुध ग्रह कन्या आणि मिथुन राशीचा स्वामी आहे. बुध या ग्रहाला नवग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा प्राप्त आहे. या गोचरामुळे काही राशींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.  बुध ग्रहाला बुद्धी, शक्ति आणि कलेचं ग्रह मानलं जातं. बुध ग्रहाच्या गोचरामुळे कोणत्या राशींना फायदा होणार जाणून घेऊयात...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष- या राशीच्या जातकांना बुध ग्रहाचं गोचर अपेक्षित फळ देईल. या कालावधीत धार्मिक क्षेत्रात आवड निर्माण होईल. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. यामुळे एकमेकांवरचा विश्वास आणखी दृढ होईल. त्याचबरोबर या काळात आर्थिक कोंडी फुटेल. अडकलेले पैसे मिळतील, तसेच या कालावधीत काही करार निश्चित होतील. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. नवीन नोकरीची ऑफर देखील या कालावधीत मिळू शकते.


वृषभ- बुध गोचरामुळे वृषभ राशीच्या जातकांना फायदा होईल. या काळात बढतीचा योग असून कामाच्या ठिकाणी अपेक्षित फळ मिळेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. नवीन उद्योग सुरु करणाऱ्यांसाठी ग्रहमान चांगलं आहे. या काळात काही चांगल्या घडामोडी घडतील. तसेच मनाप्रमाणे घटना घडतील.


कर्क- या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. बुधाच्या गोचरामुळे पदोन्नतीचा योग आहे. नवीन योजना आखली असल्यास या काळात त्याचा अवलंब करू शकता. मेहनतीला अपेक्षित यश मिळेल असं ग्रहमान आहे. या काळात आत्मविश्वास दुणावलेला असेल. विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.


बातमी वाचा- Grahan 2023: नववर्षात एकूण चार ग्रहण! जाणून घ्या तारीख, वेळ आणि सूतक काळ


कन्या- बुध ग्रह काही दिवस मकर राशीत ठाण मांडणार असल्याने कन्या राशीला फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना या काळात नोकरी मिळेल. तसेच काही मतभेद असतील तर संपतील. हा काळ आर्थिकदृष्ट्या सुगीचा असेल. पण या कालावधीत आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)