Solar And Lunar Eclipse 2023: नववर्ष सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसं असेल याबाबत विचार करत आहेत. नववर्ष (New Year 2023) आपल्या राशीसाठी फलदायी आहे की अडचणींचं ठरणार याबाबत ज्योतिषांना विचारणा केली जात आहे. दुसरीकडे, गरोदर महिलांचं ग्रहण नेमकं कधी आणि भारतातून दिसणार का? याकडे लक्ष लागून आहे. वर्ष 2023 मध्ये एकूण चार ग्रहण असून त्यात दोन सूर्यग्रहण आणि दोन चंद्रग्रहणाचा समावेश आहे. यापैकी काही ग्रहण भारतातून दिसणार आहेत. तर काही ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक कालावधी पाळण्याची आवश्यकता नाही. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. 9 तास आधी स्नान करून पूजा-पाठ करावा. सुतक काळावधील काहीही खाणे, पिणे निषिद्ध आहे. चला जाणून घेऊयात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण नेमकं कधी आणि केव्हा आहे.
पहिलं ग्रहण- 2023 या वर्षात पहिलं ग्रहण एप्रिल महिन्यात असणार आहे. 20 एप्रिल 2023 रोजी पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse) लागणार आहे. भारतीय पंचांगानुसार सकाळी 7 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत ग्रहण कालावधी असणार आहे. पण सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक कालावधी पाळण्याची गरज नाही.
दुसरं ग्रहण- 2023 या वर्षातील दुसरं ग्रहण 5 मे 2023 रोजी असणार आहे. हे चंद्रग्रहण (Lunar Eclipse) असून शुक्रवारी रात्री 8 वाजून 45 मिनिटं ते रात्री 1 वाजेपर्यंत असणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक कालावधी पाळण्याची अवश्यकता नाही.
तिसरं ग्रहण- या वर्षातील तिसरं ग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी असणार आहे. वर्षातील दुसरं सूर्यग्रहण असून भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक कालावधी मान्य नसेल.
बातमी वाचा: Tulsi Manjiri Upay: तुळशी मंजिरीच्या उपायांनी देवी लक्ष्मीला करा प्रसन्न, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय
चौथं ग्रहण- वर्षातील शेवटचं आणि दुसरं चंद्रग्रहणी 29 ऑक्टोबर 2023 रोजी असणार आहे. रात्री 1 वाजून 6 मिनिटं ते रात्री 2 वाजून 22 मिनिटापर्यंत चंद्रग्रहण असेल. भारतात ग्रहण कालावधी एक तास 16 मिनिटं इतकं असणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार असून सूतक कालावधी संध्याकाळी 5 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)