Budh Grah Vakri In Kanya Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर ग्रह वक्री होतात. ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाचे स्थान खूप खास असल्याचे सांगितले जाते. बुध ग्रहामध्ये वक्री अवस्थेतही अतिशय प्रभावी फळ देण्याची क्षमता आहे. वक्री अवस्थेतही वाणी, स्वभाव आणि व्यवसायाच सुवर्णसंधी प्राप्त होती. बुध ग्रह वक्री अवस्थेत काही राशींना शुभ फळ देणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध ग्रह कन्या राशीत 10 सप्टेंबर, शनिवारी सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी वक्री होईल. बुध ग्रहाची ही स्थिती 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहील. त्यानंतर बुध ग्रह पुन्हा मार्गस्थ होईल. मिथुन आणि कन्या राशीवर बुध ग्रहाचा प्रभाव आहे. कन्या राशीतील बुध उच्च फळ देतो. अशा स्थितीत कन्या राशीत बुधाचे वक्री होणे शुभ असेल. चला तर जाणून घेऊयात कोणत्या राशींना शुभ फळं मिळतील.


मिथुन - या राशीच्या लोकांसाठी चौथ्या स्थानात बुध वक्री होईल. या काळात नफा कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. समाजात तुमची प्रतिमा चांगली राहील. वडिलोपार्जित मालमत्तेत नफा मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. कायदेशीर अडचणी दूर होतील.


कन्या - या राशीत बुध ग्रह वक्री होईल. त्यामुळे या राशीवर त्याचा जास्तीत जास्त प्रभाव राहील. तुमच्या स्वभावात आणि संवादात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील. व्यवसायाशी संबंधित लोकांकडून नफा मिळण्याचे चांगले संकेत आहेत. 


वृश्चिक - तुमच्या राशीतील अकराव्या स्थानात बुधाचे भ्रमण होईल. या कारणास्तव, तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळविण्याची संधी आहे. तणावातून मुक्ती मिळेल. लाभाच्या संधी मिळतील. पगारदारांना नोकरीत पदोन्नती व प्रतिष्ठा मिळेल.


धनु - तुमच्या राशीच्या दहाव्या घरात बुध वक्री होणार आहे. तुमच्या बोलण्यात गोडवा राहील, त्यामुळे तुमचे अनेक लोकांशी चांगले व्यावसायिक संबंध असतील. ज्याचा लाभ तुम्हाला दीर्घकाळ मिळेल. पैसे कमविण्याच्या चांगल्या संधी मिळतील.


मकर - मकर राशीच्या लोकांचे भाग्य वाढेल. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला विजय मिळेल. प्रत्येक निर्णय तुमच्या बाजूने येण्याची चिन्हे आहेत. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. धार्मिक विधींमध्ये सहभागी होऊन तुमचे मन खूप आनंदित होईल.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)