Surya Budh Yuti 2023 in Singh : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांचं गोचर अतिशय महत्त्वाचं आहे. प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला ग्रह आपली स्थिती बदलतात. त्यातून अशावेळी काही ग्रहांची राशींमध्ये भेट होते. या भेटीतून काही योग तयार होता. सध्या ग्रहांचा राजा सूर्य सिंह राशीत असून तिथे त्याची बुध ग्रहाची युती झाली आहे. त्यामुळे सिंह राशीत बुधादित्य राजयोग तयार झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 16 सप्टेंबर 2023 पर्यंत हा योग असणार आहे. हा अत्यंत शुभ असा योग काही राशींच्या नशिबात अमाप संपत्ती, यश आणि कीर्ती घेऊन आला आहे. या राजयोगाचा सर्वाधिक लाभ हा 12 राशींपैकी 3 राशींच्या लोकांना होणार आहे. (budh surya yuti in singh 2023 making budhaditya rajyog 3 zodiac people get Rich before 16 september)


'या' राशींची लोक होणार कोट्यधीश!


मेष (Aries)


या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप लाभदायक ठरणार आहे. या लोकांना मोठे पद लाभणार आहे. धनलाभाचे योग जुळून आले आहेत. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. शिवाय व्यवसायात त्यांना मोठा फायदा होणार आहे. मोठे करार होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. 16 सप्टेंबरपर्यंतचा काळ तुमच्यासाठी खूप भाग्यशाली असणार आहे. 


कर्क (Cancer)


बुधादित्य राजयोग या राशीच्या लोकांसाठी खूप जास्त फलदायी ठरणार आहे. या लोकांना आर्थिक फायदा होणार आहे. यांच्या उत्पन्नात वाढ होणार असून यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. करिअरच्या दृष्टीकोनातून हा काळ अतिशय लाभदायक आहे. 


तूळ (Libra)


बुधादित्य राजयोग या राशीच्या लोकांना वरदानापेक्षा कमी नसणार आहे. बुधादित्य राजयोगाचा सकारात्मक परिणाम तुमच्या जीवनात दिसून येणार आहे. व्यावसायिकांना कार्यालयात अनुकूल वातावरण मिळणार असल्याने सकारात्मक परिणाम दिसतील.कामगिरी चांगली होणार असल्याने तुमची स्तुती होणार आहे. कर्जातून तुमची सुटका होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होणार आहे. जोडीदारासोबत मधुर संबंध निर्माण होणार आहे.


हेसुद्धा वाचा - Horoscope Money Weekly : 28 ऑगस्ट - 3 सप्टेंबर : 'या' राशींना धनलाभाचे योग! जाणून घ्या कशी असेल तुमच्या खिशाची स्थिती?


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.