Budh Vakri 2022 : वर्षाच्या अखेरच्या दिवशी बदलणार `या` राशींचं भविष्य; नोकरी आणि नात्यांवर होणार मोठे परिणाम
Budh Vakri 2022 : ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) प्रत्येक राशीसाठी प्रत्येक ग्रह असंख्य गोष्टी सुचवत असतो. यामध्ये बुध ग्रहाला धन, बुद्धी आणि व्यवसायाचा धनी मानण्यात आलं आहे.
Budh Vakri 2022 : ज्योतिषविद्येमध्ये (Astrology) प्रत्येक राशीसाठी प्रत्येक ग्रह असंख्य गोष्टी सुचवत असतो. यामध्ये बुध ग्रहाला धन, बुद्धी आणि व्यवसायाचा धनी मानण्यात आलं आहे. अशी धारणा आहे, की पत्रिकेमध्ये बुध असल्यास व्यवसायामध्ये प्रचंड यश मिळलतं. सोबतच बुध धनी असणाऱ्या राशीच्या व्यक्ती तल्लख बुद्धिच्या आणि एक चांगले वक्ते म्हणून समाजात नावाजले जातात. यंदाच्या वर्षाचा शेवटचा दिवस, म्हणजेच 31 डिसेंबर हा दिवस अशाच व्यक्तींसाठी प्रचंड खास असणार आहे. कारण, बुधाची वक्री चाल 3 राशींसाठी फायद्याची ठरणार आहे. (Budh Vakri read details latest marathi news )
तुम्हीही असणार का लाभार्थी?
बुधाची वक्री चाल सिंह, कुंभ आणि मीन राशीसाठी फायद्याची ठरणार आहे. चला तर मग या राशींना नेमका फायदा कसा होणार ते सविस्तर पाहू...
सिंह - सिंह राशीच्या व्यक्तींना बुध वक्रीचा फायदा होणार आहे. त्यांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होणार आहे, धनलाभाची संधी चालून येणार आहे. अर्थार्जनाच्या संधी मिळणार असल्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. नवं घर- गाडी खरेदी करण्याचे बेत आखाल. आईचा आशीर्वाद फळणार आहे. करिअरसाठी (career) हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदवार्ता मिळणार आहे.
कुंभ - बुध ग्रहाची वक्र चाल तुमच्या राशीसाठी मोठ्या फायद्याची ठरणार आहे. नोकरीमध्ये पुढे जाण्याची हीच संधी मिळणार आहे. व्यवसायामध्ये एखादी मोठी ऑर्डर मिळणार आहे. अर्थार्जनाच्या संधी वाढतील. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. एखाद्या अशा व्यवहारामध्ये पैसे (investment) गुंतवण्याची संधी मिळेल जो तुम्हाला पुढे जाण्याची संधी देईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचा वरिष्ठांवर प्रभाव असेल.
हेसुद्धा वाचा : Horoscope 5 December : या राशीच्या व्यक्तींनी बेकायदेशीर काम करण्याचा प्रयत्न करू नये!
मीन - बुधाची वक्रचाल तुमच्या राशीला प्रचंड फायदा करुन देणार आहे. नोकरी करणाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे. नोकरी नसणाऱ्यांना एखादी अशी संधी मिळेल, ज्यामुळं तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळेल. व्यापारामध्ये मोठा फायदा होणार आहे. हा काळ आणि वर्षाचा शेवट तुम्हाला प्रगतीपथावर नेणार आहे. (job news)
(वरील माहिती सर्वसामान्य धारणांच्या आधारे देण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)