Horoscope 5 December : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.
मेष
या राशीच्या व्यक्तींची आज दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. पण संध्याकाळनंतर फारसा फायदा होणार नाही. व्यसनांना आवार घालण्याची खूप गरज आहे.
वृषभ
तुमचा दिवस आज उत्साहाने भरलेला असणार आहे. चांगल्या कामासाठी तुम्हाला काही दिवस वाट पहावी लागणार आहे.
मिथुन
आजच्या दिवशी लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात चढ उतार येऊ शकतो. समजूतदारपणा दाखवून तुम्ही कठीण परिस्थितीतून बाहेर पडू शकणार आहात.
कर्क
आजच्या दिवशी कोणताही आर्थिक व्यवहार करताना डोळसपणे करा. खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवा.
सिंह
या राशीच्या व्यक्तींनी आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावं. महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. पार्टनरसोबत असलेले मतभेद संपुष्टात येणार आहेत.
कन्या
आजचा सोमवार नवीन उपक्रमासाठी उत्तम दिवस आहे. तुम्ही अनेक उपक्रम यशस्वीपणे हाताळणार आहात.
तूळ
या सोमवारी तुम्हाला विविध स्तरावर अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गोंधळलेल्या स्थितीत आजचा दिवस जाऊ शकतो. वेळेवर काम पूर्ण करा.
वृश्चिक
आजच्या दिवशी तुम्ही चिंतेत असणार आहात. तुम्ही अनावश्यक गुंतागुंतीमध्ये अडकण्याची शकता दाट आहे. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी वेळ लागू शकतो.
धनू
आजच्या दिवशी व्यावसायिकदृष्ट्या खूप यशस्वी होणार आहात. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तुमचा आत्मविश्वासही खूप वाढणार आहे.
मकर
सोमवारी तुमच्यापैकी अनेकांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर प्रवास होणार आहे. कौटुंबिक वातावरणातील तणावपूर्ण दिवस जाऊ शकतो.
कुंभ
आजच्या दिवशी बेकायदेशीर काम करण्याचा प्रयत्न करू नका. एखादी अडचण येईल, मात्र ती लगेच सुटू शकते.
मीन
नशिबाच्या मदतीने तुम्ही मोठं यश मिळवू शकता. आर्थिक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त आहे.