Budhaditya Yog In Sinh Rashi: ज्योतिषशास्त्रात ब्रह्मांडातील ग्रहांच्या युती आणि आघाड्यांची चर्चा होते. कारण ग्रहांच्या गोचराचा 12 राशींवर परिणाम होत असतो. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ फळ मिळतं. त्यामुळे ज्योतिषगुरुंची ग्रहांचा गोचर आणि युतीकडे बारीक नजर असते. गोचर आणि युतीवरून फलश्रृतीचं भाकीत केलं जातं. 17 ऑगस्टला सूर्य ग्रह कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे सिंह राशीत बुधादित्य योग तयार होणार आहे. हा योग 21 ऑगस्टपर्यंत असणार आहे. सिंह राशीतील बुधादित्य योगामुळे तीन राशींना विशेष लाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृश्चिक: सिंह राशीतील बुधादित्य योग वृश्चिक राशीच्या जातकाना करिअर आणि उद्योग धंद्यात यश मिळवून देईल. कारण बुधादित्य योग या राशीच्या दहाव्या स्थानात तयार होत आहे. या स्थान नोकरी आणि उद्योग धंद्याशी निगडीत आहे. या काळात नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. त्याचबरोबर काम करत असलेल्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते. उद्योग धंद्यात नफा मिळू शकतो.


तूळ: या राशीच्या गोचर कुंडलीच्या अकराव्या स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. या स्थानाला उत्पन्न आणि लाभाचे ठिकाण म्हणतात. या काळात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करू शकता. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित कोणताही निर्णय या काळात घेता येईल. 


सिंह: ज्योतिष शास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. या काळात विशेष धनलाभ होण्याची शक्यता आहे. बुधादित्य योगामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. पैसा येण्याचे अनेक नवीन मार्ग खुले होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध सुधारतील. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा काळ व्यापाऱ्यांसाठीही अनुकूल असणार आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)