Makar Rashifal Yearly Predictions :वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनिदेव असून तो न्यायदेवता किंवा कर्माचा दाता म्हणून ओळखला जातो. प्रत्येक राशीवर आयुष्यात तीनदा शनिदेवाच्या साडेसातीला तोंड द्यावं लागतं. सध्या मकर राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु असल्याने या राशीला कठोर परीश्रम करावे लागत आहे. या लोकांची मानसिक अस्वस्थता कायम राहणार आहे. (Capricorn yearly horoscope 2024 predictions Makar rashi know Makar rashifal in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, 1 जानेवारी 2024 च्या मकर राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थितीवर लक्षकेंद्रत केलं तर तुमच्या संक्रमण कुंडलीच्या चढत्या घरात कोणताही ग्रह नसरणार आहे. दुसऱ्या घरात तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव तर राहू तिसऱ्या घरात आणि गुरु चौथ्या घरात आहे. चंद्र आठव्या भावात आणि केतू नवव्या भावात विराजमान असणार आहे. तसंच बुध आणि शुक्र 11व्या भावात तर मंगळ आणि सूर्य 13व्या घरात असेल. आता या वर्षी मे महिन्यात जेव्हा गुरु पाचव्या भावात गोचर करणार आहे, तेव्हा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होणार आहे. तुमचे सर्व कामं मार्गी लागणार आहे. तुमच्या चौथ्या घरात राहू आणि गुरुचा चांडाल या काळात दूर होणार आहे. त्यामुळे जानेवारीपासून बृहस्पति तुम्हाला शुभ परिणाम देणार आहे.. तसंच शनिदेव धनगृहात असल्याने तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. 


मकर राशीच्या लोकांचा व्यवसाय 2024 


तुम्ही नवीन वर्षात काही नवीन काम सुरू करायचा विचार करत असाल तर ते 1 मे नंतर उत्तम वेळ आहे. 1 मे नंतर गुरु तुमच्या पाचव्या भावातून गोचर करणार आहे. नोकरदार लोक या काळात नोकरी बदल करु शकता. तसंच, तुम्ही जिथे काम करत आहात, तिथे तुमची बढती आणि पगारवाढ होणार आहे. त्याच वेळी, गुरूची नजर भाग्य, उत्पन्न आणि वाढत्या घरावर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. त्याशिवाय तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. 


मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती 2024 


2023 पेक्षा 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप चांगले सिद्ध होणार आहे. या वर्षी तुम्हाला नोकरी-व्यवसायात लाभ होणार आहे. तसंच व्यवसायात तुम्हाला नफा मिळणार आहे. एप्रिलनंतर तुम्ही वाहने आणि मालमत्ता खरेदी करणार आहात. बँक बॅलन्सही वाढणार आहे. नवीन वर्षात जुगार आणि सट्टेबाजीपासून दूर राहा अन्यथा मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल. 


मकर राशीच्या लोकांचे करिअर आणि शिक्षण 2024 


2024 हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी यशस्वी असणरा आहे. जेव्हा गुरू 1 मे ला पाचव्या घरात प्रवेश करणार आहे तुम्हाला विशेष फायदा होणार आहे. तुम्ही कोणत्याही उच्च शिक्षणासाठी प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर परदेशात शिक्षणासाठी जाऊ शकता. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळणार आहे. 


मकर राशीचे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध 2024 


जर आपण आपल्या प्रेम प्रकरणांबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर या वर्षात आपले संबंध सुधारणार आहे. कारण 2023 हे वर्ष नात्यांसाठी फारसं चांगलं नसणार आहे. तुम्हाला वैवाहिक जीवनात आणि ऑफिसच्या कामात जो ताण जाणवणार आहे. अविवाहितांचं एप्रिलनंतर लग्न आणि प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे. 


मकर राशीचे आरोग्य 2024 


2024 हे वर्ष तुमच्या आरोग्यासाठी सकारात्मक असणार आहे. आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या तुम्हाला होणार नाही. मात्र वर्षातील काही महिने तुम्ही सावधगिरी बाळगवी लागणार आहे. 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याशिवाय 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत हा काळही आरोग्यासाठी चांगला नाही. त्याचवेळी, डिसेंबर महिन्यातही तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत गाफील राहून चालणार नाही. 


मकर 2024 साठी उपाय 


वर्षभर शंकराची पूजा करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तसंच सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध आणि मध अर्पण करा. वर्षभर हनुमान चालिसाचा पाठ आणि शनिवारी उपवास करा. शिवाय शनिवारी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचं दान करा.  


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)