Chanakya Niti: आपल्या सर्वांचीच अशी मनोकामना असते की आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी यश मिळावं आणि आपण सतत यशस्वी व्हावं. परंतु अनेकांना काही केल्या यश मिळत नाही. त्यामुळे अशी माणसं ही सतत चिंतेत आणि नैराश्यातही असतात. त्यामुळे काय करावं हे त्यांना काही केल्या समजतच नाही. परंतु यश अपयश हे आपल्या हातात नसतं. परंतु योग्य दिशेनं मेहनत करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला चांगल्या सवयीही लावणं हे फार महत्त्वाचं असतं. लोकं याकडे फार दुर्लेक्ष करतात परंतु आपल्या आयुष्यातील वाईट सवयीही आपल्याला फार महागात पडतात. या लेखातून आपण याच सवयींबद्दल जाणून घेणार आहोत. चाणक्य नीतीनुसार, तुम्हाला जर का या काही वाईट सवयी असतील तर तुम्हाला त्याचा फारच वाईट फटाका बसू शकतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कोणत्या वाईट सवयी सोडणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा लोकांच्या नशीबी पटकन यश येते तर काहींना प्रचंड मेहनत करून अजिबातच यश मिळत नाही. अशावेळी पटकन यश कसे काय मिळाले याचे आश्चर्य तर असतेच परंतु सोबतच अनेकांच्या पदरी हे सतत अपयश आल्यानं अशा व्यक्ती मात्र फार दुखीही असतात. परंतु तुम्हाला जर का या वाईट सवयी असतील तर मात्र तुम्ही यशाच्या सर्वाच्च शिखरावर असाल तर तुम्हाला मात्र याच काही वाईट सवयींमुळे पुन्हा एकदा अपयश येऊ शकते. या लेखातून आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे जर का आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला सतत सकारात्मक विचार आणि मेहनत करणं हे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यातून जिद्द आणि नशीबाचाही त्यात भाग असतो. परंतु या तीन सवयी मात्र त्यावर पाणी फिरवू शकतात. 


हेही वाचा : कोण म्हणतं शिक्षणात कच्चे; शाहरूखपासून ते विजय सेतुपती... कोण किती शिकलं आहे?


कमी मेहनत : चाणक्य नीतीनुसार काही लोकांना तर सकाळी उठल्या उठल्याच बराच आळस येतो. जी माणसं अशाप्रकारे सतत आळस देतात त्यांच्याकडे पैसे जास्त टिकतही नाहीत. अशी लोकं हे मेहनत घेण्याची तसदी अजिबातच दाखवत नाहीत. त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यावर नाराज असते. अशा लोकांकडे कधीच पैसे टिकत नाहीत. मेहनत करणाऱ्या लोकांकडेच पैसा टिकतो अशीच माणसं ही पुढे जातात. 


दान करण्यात कंजुषपणा : चाणक्यनीतीनुसार, जे लोकं सतत कंजुषी दाखवतात त्यांच्याकडेही पैसा टिकत नाही. सोबतच त्यांची उनत्तीही होत नाही. दान करण्यात जे कंजुषी दाखवतात त्यांना फार त्रासही सहन करावा लागतो. दान करणं हे पुण्याचे काम आहे. पण जे दानाचे काम करतात त्यांच्यावर देव प्रसन्न राहतो. 


पैशांनी किंमत नसलेली व्यक्ती : धन हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यातून याची किंमत जाणून घ्यायला हवी. ज्यांना याची जाणिव नसते आणि जे लोकं हे फक्त खर्च करत असतात. त्यांना मात्र फार त्रासही सहन करावा लागतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)