Chanakya Niti: पडत्या काळात चुकूनही करू नका असं काम, अन्यथा जवळचे नातेवाईकही घेतील फायदा
Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत आजही चर्चा होते. कारण इतक्या वर्षानंतरही त्यांनी सांगितलेली तत्त्व तंतोतंत लागू होतात. आचार्य चाणक्य महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी नीतिशास्त्रात यशस्वी जीवनाविषयी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो.
Chanakya Niti for Relatives: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राबाबत आजही चर्चा होते. कारण इतक्या वर्षानंतरही त्यांनी सांगितलेली तत्त्व तंतोतंत लागू होतात. आचार्य चाणक्य महान विद्वान, अर्थशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी होते. त्यांनी नीतिशास्त्रात यशस्वी जीवनाविषयी सांगितलं आहे. त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांच आजही पालन केलं तर माणूस कठीण परिस्थितीतून सहज बाहेर पडू शकतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्याच्या जीवनावर खूप प्रभाव पडतो आणि कठीण काळात केलेल्या चुकीमुळे नुकसान होतं. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात तपशीलवार वर्णन केले आहे.
भोळा स्वभाव पडतो महागात
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, अति भोळे असणार्या व्यक्तीला गृहीत धरलं जातं. त्यामुळे कठीण काळात अधिकचा त्रास सहन करावा लागतो. चाणक्य यांनी अशा स्वभावाच्या लोकांची गणना मूर्ख लोकांच्या श्रेणीत केली आहे. पडत्या काळात जर अशा व्यक्तींनी आपला स्वभाव बदलला नाही तर त्याला आणखी त्रास सहन करावा लागू शकतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, जगात आपलं ध्येय साध्य करण्यासाठी स्वार्थी आणि हजरजबाबी असणं गरजेचं आहे.
बातमी वाचा- Havan Upay: हवनमधील राख असते प्रभावशाली, 'या' उपयांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल!
भोळ्या सभावामुळे येतात अडचणी
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक अतिशय साधे आणि सरळ स्वभावाचे असतात त्यांच्या जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चाणक्य यांनी सरळ माणसांची तुलना जंगलातील सरळ झाडाशी केली आहे. कारण असे झाड सर्वात आधी कापले जाते. कारण त्यासाठी कमी मेहनत घ्यावी लागते आणि वाकडीतिकडी झाडे तग धरून राहतात. आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, माणसाने परिस्थितीनुसार आपल्या स्वभावात बदल केला पाहिजे आणि त्याने हुशारी दाखवली पाहिजे, अन्यथा त्याचा गैरफायदा इतर लोक घेतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)