Chanakya Niti for Women: `अशा` स्त्रियांचा सहवास करेल तुमचं आयुष्य उद्धवस्त; जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
Chanakya Niti for Women : चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्यांच्या धोरणात नमूद केलेली महिलांची वैशिष्ट्यं आणि त्याचा जीवनावर होणारा परिणाम आज आपण जाणून घेणार आहोत.
Chanakya Niti for Women : सुखी जीवन जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. माणसाच्या सुखी जीवनासाठी चाणक्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिली आहे. चाणक्य नीती या त्यांच्या ग्रंथाद्वारे तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. चाणक्य नीती मूळतः संस्कृतमध्ये लिहिलेली आहे. आचार्य चाणक्य यांचे राजकारण, व्यवसाय आणि पैसा याविषयीचे ज्ञान इतके अचूक आहे. त्याचं हे ज्ञान आजच्या युगातही उपयुक्त आहे.
चाणक्यांनी त्यांच्या या ग्रंथामध्ये व्यावहारिक जीवनातील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती दिलेली आहे. या गोष्टींमध्ये स्त्री-पुरुषांमधील कमतरता आणि चांगुलपणाही यांच्याबाबत चाणक्यांनी सांगितलं आहे. चाणक्य नीती सांगते की, व्यक्तीने कोणत्या परिस्थितीत कसं वागलं पाहिजे. यावेळी महिलांचे वैशिष्ट्य सांगताना आचार्य चाणक्य म्हणाले की, त्यांच्यात काही उणिवा असतील तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. चाणक्यांच्या धोरणात नमूद केलेली महिलांची वैशिष्ट्यं आणि त्याचा जीवनावर होणारा परिणाम आज आपण जाणून घेणार आहोत.
चाणक्यांनी सांगितले महिलांमध्ये असणारे चांगले आणि वाईट गुण
चाणक्य नीतीनुसार, प्रत्येकाचं वैवाहिक आयुष्य हे सुखी व्हावं अशी इच्छा असते. मात्र यासाठी पत्नीमध्ये काही खास गोष्टी असणं महत्त्वाचं आहे. जर जोडप्यामधील स्त्रियांकडे खास बाबी नसतील तर त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात.
चाणक्यांच्या नीतीनुसार, जर पत्नीचं चारित्य चांगलं नसेल किंवा ती सुख-दुखात आपल्या पतीला साथ देत नसेल तर त्या कुटुंबाचं कधीही भलं होत नाही. त्यामुळे पत्नीने प्रत्येक गोष्टीमध्ये पतीला साथ देणं गरजेचं आहे.
आचार्य चाणक्यांच्या मते, बायकोची वागणूक चांगली नसेल, ती भांडखोर असेल, आळशी असेल, खूप खर्चीक असेल, तर असे कुटुंब गरिबीत जातं. जर महिला अशा स्वभावाच्या असतील तर घरात ना पाहुणे येत ना माता लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे घरात बायकोची वागणूक चांगली असून ती आळशी नसली पाहिजे, असं चाणक्य म्हणतात.
जर सुसंस्कृत पत्नी आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात. चांगल्या वाईट काळात पतीची साथ देते. असे कुटुंब सर्वात मोठ्या आव्हानावरही सहज मात करते.
जर पत्नीची वागणूक चांगली नसेल, तिचे संस्कार योग्य नसतील तर अशा पत्नीचा सहवास चांगल्या आयुष्याचाही नाश करतो. अशा कुटुंबात कधीही सुख-शांती नांदत नाही, असं आचार्य चाणक्य सांगतात.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )