मुंबई : नवरा-बायको यांच्या संसाराची गाडी कोणत्याही एका व्यक्तीमुळे चालणार नाही. त्यासाठी दोघांचाही समावेश तेवढाच असावा लागतो. लग्नानंतर नवरा बायको यांच्या आयुष्यात मोठा फरक होतो. कारण त्यांना आपलं आयुष्य नव्याने सुरु करावं लागतं. परंतु हे लक्षात घ्या की, प्रत्येक नवरा बायकोचं एकमेकांप्रती कर्तव्य असतं. तसेच चाणाक्यनीतीनुसार एक महिला ही तिच्या कुटुंबासाठी फार महत्वाची असते. तिच्यातील गुण हे तिच्या नवऱ्य़ासाठी फार महत्वाचे असतात. जे तिच्या नवऱ्याचे भाग्य बदलायला मदत करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर बायकोमध्ये किंवा स्त्रीध्ये कोणते गुण असायला हवेत, जे तिच्या नवऱ्यासाठी भाग्याचे ठरेल. हे जाणून घेऊया.


सुशिक्षित आणि सुसंस्कृत स्त्री. धार्मिक ग्रंथांचे ज्ञान असणारे व्हा. योग्य आणि अयोग्य फरक समजण्यात सक्षम असणारी स्त्री स्वतःही चांगली वागते आणि मुलांना सुसंस्कृत बनवते. ज्या घरात अशी स्त्री असते, ते घर नेहमी सुखी असते. यासोबतच त्यांना समाजात खूप प्रतिष्ठा मिळते.


अशी स्त्री जी कठीण काळात काही पैसे साठवून ठेवते, तिचा नवरा खूप भाग्यवान असतो. अशी समजूतदार स्त्री आपल्या कुटुंबाला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे धाडस करते. तसेच कठीण प्रसंगी कोणाच्याही समोर हात पसरण्यापासून कुटुंबाला वाचवते.


तसेच जी नातेवाईकांशी, समाजातील प्रत्येकाशी चांगले वागते, प्रत्येकजण त्या कुटुंबाशी जोडलेला असतो. नातेवाईक, संत, महात्मे आनंदाने त्या घरी येतात आणि आशीर्वाद देतात. त्या स्त्रीमुळे ती भाग्यवान होते.


अशी स्त्री जी धीर धरते, तिचा नवरा खूप भाग्यवान असतो, कारण अशी स्त्री प्रत्येक संकटाला धीराने तोंड देते आणि तिच्या पतीची मजबूत ढाल बनते. अशी स्त्री सोबत असेल, तर पुरुष प्रत्येक आव्हानावर सहज मात करू शकतो.


(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.)