Astrology 2022: चंद्र सप्टेंबर महिन्यात 13 वेळा करणार राशी बदल, या ग्रहांशी होणाऱ्या युतीमुळे शुभ योग
चंद्र सव्वा दोन दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषात, कुंडली जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या चंद्राची स्थिती पाहीली जाते.
Chandra Grah Gochar 2022: ज्योतिषशास्त्रात चंद्र हा नवग्रहांपैकी एक ग्रह आहे. खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून चंद्राला खूप महत्त्व आहे. समुद्रात भरती-ओहोटी येण्यापासून ते ग्रहणापर्यंत चंद्राचं महत्त्व आहे. सूर्यमालेतील चंद्राची स्थिती सर्व ग्रहांपेक्षा वेगळी आहे. सूर्यानंतर चंद्र हा आकाशातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. वैदिक ज्योतिषात चंद्राला मनाचा कारक मानला जातो. चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामाच अनेक अडचणी येतात. चंद्राच्या राशी बदलाचा बारा राशींवर परिणाम होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. रोहिणी, हस्त आणि श्रवण या नक्षत्रांचा स्वामी आहेत. सर्व ग्रहांमध्ये चंद्राचा गोचर वेग सर्वाधिक आहे. चंद्र सव्वा दोन दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषात, कुंडली जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या चंद्राची स्थिती पाहीली जाते. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्याला त्या व्यक्तीचे चंद्र राशी म्हणतात.
राशी प्रवेश | दिनांक | वार | वेळ | योग |
तूळ राशीतून वृश्चिक राशीत | 2 सप्टेंबर 2022 | शुक्रवार | संध्याकाळी 05.55 | (चंद्र) |
वृश्चिक राशीतून धनु राशीत | 4 सप्टेंबर 2022 | रविवार | रात्री 09.42 | (चंद्र) |
धनु राशीतून मकर राशीत | 6 सप्टेंबर 2022 | मंगळवार | रात्री 11:38 | (चंद्र+शनि) |
मकर राशीतून कुंभ राशीत | 9 सप्टेंबर 2022 | शुक्रवार | सकाळी12:39 | (चंद्र) |
कुंभ राशीतून मीन राशीत | 11 सप्टेंबर 2022 | रविवार | सकाळी 02:23 | (चंद्र+ गुरु) |
मीन राशीतून मेष राशीत | 13 सप्टेंबर 2022 | मंगळवार | सकाळी 06:35 | (चंद्र+राहु) |
मेष राशीतून वृषभ राशीत | 15 सप्टेंबर 2022 | गुरुवार | दुपारी 02:28 | (चंद्र+मंगळ) |
वृषभ राशीतून मिथुन राशीत | 18 सप्टेंबर 2022 | रविवार | सकाळी 01:43 | (चंद्र) |
मिथुन राशीतून कर्क राशीत | 20 सप्टेंबर 2022 | मंगळवार | दुपारी 02:23 | (चंद्र) |
कर्क राशीतून सिंह राशीत | 23 सप्टेंबर 2022 | शुक्रवार | सकाळी 02:03 | (चंद्र) |
सिंह राशीतून कन्या राशीत | 25 सप्टेंबर 2022 | रविवार | सकाळी 11:22 | (चंद्र+सूर्य) |
कन्या राशीतून तूळ राशीत | 27 सप्टेंबर 2022 | मंगळवार | संध्याकाळी 06:18 | (चंद्र+केतु) |
तूळ राशीतून वृश्चिक राशीत | 29 सप्टेंबर 2022 | गुरुवार | रात्री 11:24 (चंद्र) |
-विष योग- 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान चंद्र शनि ग्रहाची मकर राशीत युती होत असल्याने विष योग तयार होत आहे. या सव्वा दोन दिवसात काळजी घेणं आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांमध्ये या योगाबद्दल दोन्ही प्रकारचे परिणाम सांगितले आहेत. हा योग अशुभ श्रेणीत आहे.
-गजकेसरी योग- 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर दरम्यान चंद्र गुरु ग्रहाची मीन राशीत युती होत असल्याने गजकेसरी योग तयार होत आहे. गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग मानला जातो आणि कुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे. धनाचा कारक बृहस्पति आणि मनाचा कारक चंद्र यामुळे हा योग तयार होतो.
-ग्रहण योग- 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान चंद्र राहु ग्रहाची वृषभ राशीत युती होत असल्याने ग्रहण योग तयार होत आहे. जेव्हा चंद्र राहूच्या संयोगात येतो, तेव्हा ग्रहण योग तयार होतो, हा अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या लोकांवर त्याचे वर्चस्व असते त्यांच्या मानसिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि चंद्राच्या संबंधामुळे चंद्र दूषित होतो.
-लक्ष्मी योग- 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान चंद्र मंगळ ग्रहाची मेष राशीत युती होत असल्याने लक्ष्मी योग तयार होत आहे. गोचर कुंडलीतील चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होतो. या योगाना धन योग म्हणून संबोधलं जातं.
-ग्रहण योग- 25 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान चंद्र सूर्य ग्रहाची कन्या राशीत युती होत असल्याने ग्रहण योग तयार होत आहे. चंद्र प्रकृतीने शीतल असल्याने आणि मनाचा कारक आहे आणि दुसरीकडे सूर्य हा बलवान आणि शक्तिशाली कारकाचे प्रतीक आहे, अशा स्थितीत सूर्यासोबत एकाच घरात आल्यावर चंद्र कमजोर होतो आणि अशुभ परिणाम देऊ लागतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)