Chandra Grah Gochar October 2022: ज्योतिषशास्त्रात चंद्र हा नवग्रहांपैकी एक ग्रह आहे. सूर्यमालेतील चंद्राची स्थिती सर्व ग्रहांपेक्षा वेगळी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. रोहिणी, हस्त आणि श्रवण या नक्षत्रांचा स्वामी आहेत. सर्व ग्रहांमध्ये चंद्राचा गोचर वेग सर्वाधिक आहे. चंद्र सव्वा दोन दिवसांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्यानंतर चंद्र हा आकाशातील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. वैदिक ज्योतिषात चंद्राला मनाचा कारक मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्राच्या प्रभावामुळे व्यक्तीचे मन अशांत किंवा स्थिर होते. मनुष्याचे मनावर नियंत्रण असेल तर सगळं सहज शक्य होतं, पण मन अस्थिर असेल तर काम व्यवस्थित होत नाही. एकूणच कामाच अनेक अडचणी येतात. चंद्राच्या राशी बदलाचा बारा राशींवर परिणाम होतो. वैदिक ज्योतिषात, कुंडली जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या चंद्राची स्थिती पाहीली जाते. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्याला त्या व्यक्तीचे चंद्र राशी म्हणतात. 


चंद्र ग्रह गोचर ऑक्टोबर 2022
या राशीतून या राशीत दिनांक वार वेळ योग
वृश्चिक धनु 2 ऑक्टोबर 2022 रविवार सकाळी 03:11 चंद्र
धनु मकर 4 ऑक्टोबर 2022 मंगळवार सकाळी 06:01 चंद्र, शनि
मकर कुंभ 6 ऑक्टोबर 2022 गुरुवार सकाळी 08:27 चंद्र
कुंभ मीन 8 ऑक्टोबर 2022 शनिवार सकाळी 11:23 चंद्र, गुरु
मीन मेष 10 ऑक्टोबर 2022 सोमवार संध्याकाळी 04:01 चंद्र, राहु
मेष वृषभ 12 ऑक्टोबर 2022 बुधवार रात्री 11:29 चंद्र, मंगळ
वृषभ मिथुन 15 ऑक्टोबर 2022 शनिवार सकाळी 10:01 चंद्र, मंगळ
मिथुन कर्क 17 ऑक्टोबर 2022 सोमवार रात्री 10:28 चंद्र
कर्क सिंह 20 ऑक्टोबर 2022 गुरुवार सकाळी 10:30 चंद्र
सिंह कन्या 22 ऑक्टोबर 2022 शनिवार संध्याकाळी 08:04 चंद्र, बुध
कन्या तूळ  25 ऑक्टोबर 2022 मंगळवार सकाळी 02:33 चंद्र, केतु, सूर्य, बुध, शुक्र
तूळ  वृश्चिक 27 ऑक्टोबर 2022 गुरुवार सकाळी 06:30 चंद्र
वृश्चिक धनु 29 ऑक्टोबर 2022 शनिवार सकाळी 09:05 चंद्र
धनु मकर 31 ऑक्टोबर 2022 सोमवार सकाळी 11:23 चंद्र, शनि

गजकेसरी योग हा अतिशय शुभ योग मानला जातो आणि कुंडलीत तयार झालेल्या सर्व धन योगांपैकी हा सर्वात शक्तिशाली योग आहे. धनाचा कारक बृहस्पति आणि मनाचा कारक चंद्र यामुळे हा योग तयार होतो. जेव्हा चंद्र राहूच्या संयोगात येतो, तेव्हा ग्रहण योग तयार होतो, हा अत्यंत अशुभ मानला जातो. ज्या लोकांवर त्याचे वर्चस्व असते त्यांच्या मानसिक स्थितीवर त्याचा वाईट परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रानुसार राहू आणि चंद्राच्या संबंधामुळे चंद्र दूषित होतो. गोचर कुंडलीतील चंद्र आणि मंगळ यांच्या युतीमुळे लक्ष्मी योग तयार होतो. या योगाना धन योग म्हणून संबोधलं जातं.