चंद्रग्रहण भारतात दिसणार की नाही? पाहा काय असेल वेळ
चंद्रग्रहणाची वेळ तारीख आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या
मुंबई : या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 16 मे रोजी असणार आहे. चंद्रग्रहणाचा परिणाम हा कळत नकळत आपल्या आयुष्यावर आणि कुंडलीवर होत असतो. ग्रहण काळात कोणतेही शुभकार्य करू नये असं मानलं जातं.
चंद्रग्रहणाचा काही लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. या काळात गर्भवती महिलांना घराबाहेर पडू नये असं सांगितलं जातं. हे चंद्रग्रहण किती वेळाचं असेल आणि कुठे असणार आहे याबाबत माहिती जाणून घेऊया.
चंद्रग्रहण सोमवारी सकाळी 7.58 मिनिटांनी सुरू होईल ते रात्री 11. 25 मिनिटांनी संपणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे भारताता सूतक काळ पाळला जाणार नाही अशीही माहिती मिळाली आहे.
अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, उत्तर-दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, पश्चिम युरोप, मध्य-पूर्व या ठिकाणी चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहणात शक्यतो अन्न दूषित होते असं मानलं जातं. त्यामुळे तुळशीची पानं ठेवून ते शुद्ध केलं जातं असं मानण्याची परंपरा आहे.