मुंबई : शास्त्रामध्ये शनिदेवाला न्यायाची देवता म्हणजेच, जो व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. ज्या लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात, त्यांना जीवनात कोणत्याच गोष्टीची भीती नसते. त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात समृद्धी, कीर्ती, आनंद आणि यश मिळते. तर दुसरीकडे ज्यांच्यावर शनिदेवाची वाकडी नजर असते त्यांना अनेक शारीरिक, मानसिक आणि आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. अशा स्थितीत शनिवारी शनिदेवाच्या पूजेसोबतच काही विशेष मंत्रांचा जप करणं खूप फायदेशीर मानलं जातं. चला तर मग जाणून घेऊया शनिदेवाच्या या खास मंत्रांविषयी...


शनिवारी शनिदेवाच्या या मंत्रांचा करा जप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ॐ शं शनैश्चरायै नम:
ॐ शन्नो देवी रभिष्टय आपो भवन्तु पीपतये शनयो रविस्र वन्तुनः
ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:


Surya Gochar 2022: 17 सप्टेंबर पासून सुर्याप्रमाणे चमकेल 'या' राशीच्या लोकांचे भाग्य


ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले जाते की दर शनिवारी सकाळ आणि संध्याकाळ शनिदेवाच्या मंदिरात शनिदेवाच्या मूर्तीसमोर आसन ठेवून शनिदेवाच्या कोणत्याही मंत्राचा 108 वेळा नियमित जप केल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. जीवनातील सर्व संकटे दूर झाल्यानं जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच शनिदेवाच्या पूजेच्या वेळी गडद निळे कपडे घालणे देखील शुभ मानले जाते.


आणखी वाचा : Vishwakarma Puja 2022: तुमच्याकडे गाडी आहे तर 'या' दिवशी नक्कीच करा विश्वकर्मा पूजा


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)