Shani-Budh Yuti: मित्र ग्रह बुध-शनी यांचा होणार संयोग; `या` राशींचं नशीब फळफळणार
Conjunction Of Shani And Budh: 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीमध्ये मित्र ग्रह शनी आणि बुध यांची युती होणार आहेत. या संगोयामुळे अनेक राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे.
Conjunction Of Shani And Budh: लवकरच आता नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. दर महिन्याला अनेक ग्रह त्यांच्या स्थितीमध्ये बदल करतात. यावेळी नवीन वर्षात देखील अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत.
ज्योतिषशास्त्रानुसार, 2024 मध्ये अनेक शुभ योग आणि ग्रहांचे संयोग तयार होणार आहेत. यामध्ये बुध आणि शनिदेव यांचाही संयोग होणार आहे. 2024 च्या सुरुवातीला कुंभ राशीमध्ये मित्र ग्रह शनी आणि बुध यांची युती होणार आहेत. या संगोयामुळे अनेक राशींच्या आयुष्यात आनंद येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे.
मकर रास (Makar Zodiac)
बुध आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या वाणीवर परिणाम होणार आहे. वैवाहिक जीवन चांगले जाणार आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षा स्पर्धेत अपेक्षित यश मिळू शकते. मार्केटिंग, बँकिंग, कला आणि कम्युनिकेशनशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ उत्तम राहणार आहे.
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध आणि शनीची युती अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव वाढणार आहे. तुमच्या व्यवसायातील कमाई वाढणार आहे. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगली ऑर्डर मिळू शकते. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते.
मिथुन रास (Mithun Zodiac)
बुध आणि शनीचा संयोग तुमच्यासाठी शुभ ठरू शकणार आहे. या काळात नशीब तुमची साथ देणार आहे. शनिदेवाच्या कृपेने अध्यात्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होऊ शकते. या कालावधीत, तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी परदेशात प्रवास करू शकता. नोकरदारांना वेतनवाढ आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही परदेशात जाऊन शिक्षण घेऊ शकता.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )