राशीभविष्य १ मार्च : `या` राशीच्या व्यक्तींनी गुंतवणुकीवर लक्ष द्या
जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस
मेष- बुद्धीचातुर्याने अनेक कामं पूर्ण कराल. नियोजनावर भर द्या. नव्या गोष्टींची चाहुल लागेल. व्यवसायात यश मिळेल.
वृषभ- मानसिक स्थैर्य लाभेल. मेहनत जास्त करावी लागेल. नोकरीत समाधान मिळेल.
मिथुन- विरोधकांवर लक्ष द्या. सांस्कृतिक विषयांमध्ये आज हिरीरिने काम कराल. चंचलपणा कमी करण्याचा प्रयत्न करा.
कर्क- अतिघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. धार्मिक कामांवर लक्ष द्या. गुंतवणुकीत मोठ्यांचा सल्ला घ्या.
सिंह- अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळणार आहे. पण, तणाव वाढलेला असेल. पैशांच्या बाबतीत बऱ्याच अंशी मतभेद होऊ शकतात. पोटाचे विकार उदभवतील.
कन्या- नोकरदार वर्गाला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक गुंतवणूक करा. तुमच्या कामाची प्रशंसा होणार आहे.
तुळ- व्यापार आणि नोकरीमध्ये फायदा होणार आहे. वरिष्ठांशी चांगले संबंध तयार होतील. कोणा एका व्यक्तीमुळे तुमचा ताण वाढू शकतो. धनलाभ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक- व्यापारामध्ये प्रगती होणार आहे. अर्थात वाढ होईल. अपूर्ण कामं पूर्णत्वास जातील.
धनु- दैनंदिन कामं पूर्ण होतील. गुंतवणुकीवर लक्ष द्या. अतिघाई करु नका. आज विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागेल.
मकर- व्यवसायामध्ये पैसा अडकेल. सावधगिरीने पैसे गुंतवण्याचे निर्णय घ्या. पैसे खर्च होण्यासाठी अनेक वाटा फुटतील.
कुंभ- आज विनम्र राहा. एखादं अपूर्ण काम तुम्हाला चिंचाग्रस्त करु शकतं. आरोग्याची काळजी घ्या.
मीन- नव्या कामात मन रमेल. नोकरीसापेक्ष व्यक्तींनी धैर्याने काम करा. बदलत्या ऋतूचक्रानुसार होणाऱ्या रोगांवर लक्ष द्या.