मुंबई : रविवारी कुंभ राशीच्या व्यक्ती त्यांच्या चांगल्या व्यवहाराने इतर लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतील. तर काही लोकांनी त्यांच्या बिझनेसमध्ये पैसा लावताना काळजी घ्यावी. जाणून घ्या रविवारी तुमचं राशिभविष्य कसं आहे.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी तुमच्या वैयक्तिक कामात अधिक लक्ष द्यावं. करिअरमध्ये मोठं यश मिळण्याची चिन्हं आहेत. मित्रांसोबत नवीन व्यवसाय सुरू करू शकता. 


कर्क (Cancer)


रविवार तुमच्यासाठी चांगला आहे. या दिवशी, कोणत्याही प्रकारच्या देयक व्यवहारात सावधगिरी बाळगली पाहिजे. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. घराबाहेर आनंदाचं वातावरण राहील. 


सिंह (Leo)


रविवार काही आर्थिक बाबींसाठी दिवस शुभ राहणार आहे. महिलांनी स्वयंपाकघरात काम करताना सावध राहावं. तुळशीला पाणी घाला, दिवस चांगला जाईल. 


कन्या (Virgo)


रविवारी तुमच्या घरात पाहुण्यांची येऊ शकतात. नवीन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता. परदेशात नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस फलदायी राहील. 


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस खूप चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन बदलांमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल. वैवाहिक चर्चेत यश मिळेल. अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा.


वृश्चिक (Scorpio)


मार्केटिंग करणाऱ्या लोकांना आज चांगलं डील मिळू शकतं. व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. कोणत्याही परिस्थितीत स्वतःला तणावग्रस्त होऊ देऊ नका. 


धनु (Sagittarius)


जे वचन दिलं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. रविवारी उत्साहात पैसे खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बोलण्यावर संयम ठेवा. तुमचे जवळचे लोक तुमच्याशी दुरावू शकतात.


मकर (Capricorn)


तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या लक्ष्यावर ठेवा. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी महिला सहकर्मचाऱ्यांचा आदर करा. 


कुंभ (Aquarius)


रविवारी तुमचं आनंदी वागणं लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल. तुम्ही मुलांसोबत ऑनलाइन खरेदी करू शकता. एखाद्या कामात प्रियकराची मदत घेऊ शकता.


मीन (Pisces)


रविवारी तुम्हाला महत्त्वाच्या कामात यश मिळेल. बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.