आजचे राशीभविष्य | १४ डिसेंबर २०१९ | शनिवार
कसा असेल तुमचा आजचा दिवस ?
मेष - व्यावसायिकांसाठी दिवस चांगला नाही, कोणालाही पैसे उधार देऊ नका. नोकरदार वर्गाने सांभाळून राहा. ऑफिसमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. एखाद्या गोष्टीबाबत ताण वाटू शकतो. वाद होऊ शकतात. मानसिक तणाव राहील. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.
वृषभ - विचार करत असलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक बदल होऊ शकतात. मुलाचं सहकार्य मिळेल. मेहनतीने काम कराल, त्याचा फायदा होईल. मित्र, भावंडांकडून मदत मिळेल.
मिथुन - व्यवसायात धनलाभाची शक्यता आहे. जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराचा सल्ला महत्त्वाचा ठरु शकतो. चांगल्या संधी मिळतील. काम पूर्ण होतील. तब्येतीच्या तक्रारी जाणवू शकतात. जेवण करताना सावध राहा.
कर्क - कामाच्या ठिकाणी वातावरण योग्य नसल्याने मूड खराब होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये कोणताही निर्णय घेता येणार नाही. दररोजची कामं पूर्ण करताना समस्या जाणवू शकतात. कोणावरही अवलंबून राहू नका. तब्येतीत चढ-उतार राहील.
सिंह - आत्मविश्वास वाढेल. आज लोकांवर तुमचा प्रभाव राहील. तुमच्या विचार करण्याची पद्धत लोकांना आवडू शकते. तुमच्या सल्ल्याचा इतरांना फायदा होईल. चांगली बातमी मिळू शकते. सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.
कन्या - कुटुंबाची मदत मिळेल. तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. नवीन चांगल्या संधी मिळू शकतात. पैशांसंबंधी लक्ष द्यावे लागेल. तब्येतीत सुधारणा होईल. अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या तब्येतीच्या तक्रारींपासून आराम मिळेल.
तुळ - मेहनतीनेच यश मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. बढतीची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची संधी वाया घालवू नका. महत्त्वाच्या कामात इतरांची मदत मिळेल. दिवस चांगला आहे. तब्येत ठिक राहील.
वृश्चिक - पैशांच्या स्थितीत नुकसान होऊ शकते. कायद्याच्या गोष्टींमध्ये अडकू शकता. वेळेकडे लक्ष द्या. खास कामांसाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. अचानक घडलेल्या कोणत्याही गोष्टीवर लगेच निर्णय घेऊ नका. थकवा जाणवू शकतो.
धनु - शेअर मार्केटमध्ये विचार करुन निर्णय घ्या. बॉससोबत काम करताना सावध राहा. तुमच्या करियरसाठी महत्त्वाची असणारी लोकं समस्या निर्माण करु शकतात. तुमची मतं मांडण्यासाठी योग्य वेळ नाही. महत्त्वाचं काम पूर्ण न झाल्यास ताण घेऊ नका. धैर्य ठेवा. शांततेत दिवस जाईल.
मकर - नुकसानीची शक्यता आहे. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक बाबींमुळे वाद होऊ शकतो. अधिक जबाबदारी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत सावध राहावं लागेल. तणावात राहू शकता.
कुंभ - करियरसंबंधी चांगली बातमी मिळू शकते. जुने वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. व्यवसायात काही नवी पावलं उचलल्यास फायदा होऊ शकतो.
मीन - करियरसंबंधी निर्णय घेताना सावध राहा. विचार करुन गुंतवणूक करा. कामात चुका होऊ शकतात. इतरांची कामं तुमच्यावर लादली जाऊ शकतात. प्रमाणाहून अधिक थकवा जाणवू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार राहतील. तब्येतीकडे लक्ष द्या. लहान-लहान समस्या जाणवू शकतात.