मेष- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. नोकरीच्या ठिकाणी अनेक समस्यांवर तोडगा निघेल. अचानक येणाऱ्या अडचणींचा तुम्ही सामना कराल. आज बऱ्याच अंशी तुम्ही यशस्वी रहाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- व्यापारासाठी आजचा दिवस चांगला आहे. गुंतवणुक फायद्याची ठरेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस लाभदायी ठरेल. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा बेत आखाल. कोणा एका व्यक्तीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. 


मिथुन- भागीदारीतील व्यवसायात फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फायद्याचा आहे. महत्त्वाची कामं पूर्ण होतील. कोणतीही गोष्ट ताणू नका. तुमचं आरोग्य सुरळीत असेल. 


कर्क- एकाच वेळी अनेक कामं हाती घेऊ नका. अडचणीच्या वेळी स्वत:वर ताबा ठेवा. कामाच्या वेळी काही अडचणी येऊ शकतात. देवाणघेवाणीच्या व्यवहारांमध्ये काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या. 


सिंह- व्यावसायिकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. गुंतवणुक फायद्याची ठरेल. अविवाहितांना आज विवाहप्रस्ताव येतील. ऋतुबदलामुळे फायदा होणार आहे. 


कन्या- आज तुम्ही अडचणींमध्येही अधिक चांगल्या पद्धतीने काम कराल. उधार दिलेले पैसे बऱ्याच प्रयत्नांनंतर परत मिळवाल. अतिघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका. जुन्या आजारांपासून मुक्त व्हाल. 


तुळ- आर्थिक दृष्टीने परिस्थिती अनुकूल असेल. पती- पत्नीमध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. नकारात्मकतेपासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या. 


वृश्चिक - कामाच्या ठिकाणी काही अडचणी वाढतील. अपूर्ण कामं पूर्णत्वास जातील. कोणा एका कायदेशीर वादाचा निकाल हाती येईल. काही आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. 


धनु - नोकरीसापेक्ष लोकांसाठी परिस्थिती अनुकूल आहे. पदोन्नतीचा योग आहे. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागू शकेल. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. 



मकर - अर्थार्जनात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी इतरांचं सहकार्य करावं लागू शकेल. नशिबाची साथ मिळणार आहे. पोटाचे विकार होऊ शकतात. 


कुंभ - व्यापार आणि वादाची परिस्थिती सुधारेल. मेहनत वाढवावी लागेल. आज तुम्ही लहानमोठ्या गोष्टींमुळे अडचणीत येऊ शकता. आज दिवस चांगला असेल. 


मीन- गुंतवणुक करण्याच्या बाबतील लक्ष द्या. काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी मेहनत करा. आरोग्याची काळजी घ्या.