मेष - अनेक दिवसांपासून राहिलेली कामं पूर्ण होतील. कौटुंबिक संबंध चांगले राहतील. तुमची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. दिवस उत्साहवर्धक आणि मनोरंजनात्मक आहे. कौटुंबिक गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक समस्या मार्गी लागतील. विवाहितांसाठी दिवस चांगला आहे. प्रेम वाढेल. जुन्या आजारांपासून आराम मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - कामात व्यस्त राहाल. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. मेहनतीने धनलाभ होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासूनची कामं पूर्ण होतील. नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. दिवस चांगला आहे. अनेक कामात सक्रिय राहाल. पुढे जाण्यासाठी जीवनात काही बदल करावे लागू शकतात. अविवाहितांना जोडीदारासोबत वेळ घालवता येईल. प्रवास होऊ शकतो. 


मिथुन - घाईत कोणतंही काम करु नका. पैशांबाबत चिंता वाटेल. वायफळ खर्च होऊ शकतो. नोकरी, व्यवसायात समस्या वाढू शकतात. पैशांच्या बाबतीत सावध राहा. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिस, कामाच्या ठिकाणी तणावपूर्णस्थिती राहील. पोटासंबंधी दुखणी होऊ शकतात.


कर्क - नोकरीत समस्या होऊ शकते. दररोजच्या कामात जोखिम राहिल. हट्टीपणामुळे वाद होण्याची शक्यता आहे. कामात अडचणी आल्याने मूड खराब होऊ शकतो. धावपळ होईल. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतो. झोपेची कमतरता होईल. डोकेदुखी होऊ शकते. 


सिंह - कुटुंबात सुख-शांती राहील. कामाच्या ठिकाणी तडजोड करावी लागू शकते. सामाजिक कामात सन्मान मिळेल. चांगल्या मित्रांची भेट होईल. ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती गुप्तपणे तुमची मदत करु शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ जाईल. जोडीदार आर्थिक मदत करु शकतो. 


कन्या - व्यवसायात वाढ होईल. सहकाऱ्यांची मदत मिळेल. खास लोकांशी भेट होऊ शकते. दररोजच्या कामातून काही वेळासाठी सुटका होईल. समस्या संपण्याची शक्यता आहे. मोठ्या व्यक्तींची मदत होईल. फायदा होईल. दिवसभर थकवा वाटेल. आराम करा, अन्यथा त्रास होऊ शकतो. 


तुळ - नोकरी, व्यवसायात लाभ होऊ शकतो. दिवस चांगला आहे. अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. स्वत:च्या फायद्याचा विचार करा. नशिबाच्या साथीने कामं पूर्ण होऊ शकतात. दुसऱ्यांना नाराज न करता कामं करुन घ्या. जोडीदारावर खर्च होऊ शकतो. जोडीदारावर रागावू नका. कोणावरही तुमच्या भावना जबरदस्ती लादू नका. 


वृश्चिक - व्यवसायात फायदा कमी होईल. बदलीची शक्यता आहे. कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करु नका. दिवस काहीसा कठिण असू शकतो. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही. वायफळ कामात मन राहील. अविवाहितांच्या प्रेमसंबंधांमध्ये तणाव होऊ शकतो. जोडीदाराचा मूड चांगला राहणार नाही.


धनु - दररोजची कामं वेळेत पूर्ण होतील. विचार करुनच निर्णय घ्या. पैशांच्या स्थितीत चांगले बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंब, समाजात तुमचे महत्त्व वाढेल. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. जेवणात मसालेदार पदार्थांचा समावेश करु नका. 


मकर - व्यवसायात नवीन सुरुवात आज करु नका. दिवसाची सुरुवात तितकीशी चागंली नाही. इच्छा नसतानाही पैसे खर्च करावे लागू शकतात. तुमच्या योजना गुप्त ठेवा. कोणाशीही काहीही शेअर करु नका. वाद-विवादात अडकण्याची शक्यता आहे. कामात सुस्ती राहील. डोकेदुखी, पोटदुखी होऊ शकते. जेवताना सावध राहा.


कुंभ - आर्थिक समस्या संपतील. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ राहील. ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. कामं पूर्ण होतील. प्रयत्न केल्यास समस्या संपू शकतात. अचानक धनलाभ होऊ शकतो. चांगल्या लोकांच्या संगतीने फायदा होऊ शकतो. 


मीन - आज व्यवसायात वाढ करु नका. काम जसं सुरु आहे तसं सुरु ठेवा. महागड्या वस्तूंची खरेदी होऊ शकते. आज कोणताही महत्त्वाचा मोठा निर्णय घेऊ नका. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. थकवा आणि कमी झोपेमुळे समस्या होऊ शकते.


- डॉ. दीपक शुक्ल