मेष - एकंदर परिस्थिती पाहता आजच्या कामांची नीट आखणी कराल तर फायदा होईल. मित्रमंडळींची मदत होईल. जुन्या मित्रांशी संवाद घडेल. धनलाभ होईल. अविवाहितांना विवाहप्रस्ताव येतील. अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. व्यवसायात वाढ होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- नशीबाची साथ आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून विचारात असणारी कामंही पूर्ण कराल. जवळच्या व्यक्तीचं म्हणणं आणि त्यांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा. देवस्थानावर जाण्याची इच्छा होईल. 


मिथुन- मित्रांच्या साथीने काही नवं काम कराल. पण, सुरुवातीला प्रयत्न तुम्हालाच करायचा आहे. अविवाहीतांना प्रेमाचा किंवा लग्नाच प्रस्ताव मिळेल. कौटुंबीक मतभेद संपुष्टात येतील. तुमच्या काम करण्याची पद्धत इतरांचं मन जिंकेल. 


कर्क- करिअरमध्ये बदल होईल. त्या दिशेने वाटचालही कराल. प्रयत्न करा यश मिळेल. जवळच्या व्यक्तींसाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागला तर त्यात संकोच बाळगू नका. 


सिंह- नव्या संधी मिळतील. दैनंदिन कामं अतिशय सहजपणे पार पडतील. करिअर किंवा इतर कारणांनी ज्या व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यांच्यावर तुमच्या कामाचा प्रभाव पडेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. वाहनसुखही मिळेल. 


कन्या- अडचणीत असलेल्यांना उसंत मिळेल. बचत करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंब, शेजार-पाजारी काही अडचणीची परिस्थिती आल्याच सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. तुमचा सल्ला अनेकांना पटेल. 


तुळ- अचानक धनलाभ होण्याची शक्यता. तुमच्या कल्पनांना यश मिळेल. जवळच्या व्यक्तींशी असणारे संबंघ सुधारतील. करिअरमध्ये पुढे जाण्याच्या वाटा खुल्या होतील. मित्रांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. प्रसिद्ध व्यक्तींची भेट घडेल. 


वृश्चिक- आत्मविश्वास आणि धैर्याने महत्त्वाच्या कामाची सुरुवात कराल. यश मिळेल. काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. गुप्त माहिती मिळण्याची शक्यता. काही कामं आटोपती घेण्यासाठी पैसे खर्च करत पुढे जाल. 


धनु- फायदा होईल. आज आर्थिक व्यवहार करुन घ्या. वायफळ खर्चांपासून दूर राहा. प्रवासाचे बेत आखाल. धनलाभ होईल. अडचणी संपुष्टात येण्याची चिन्हं. 


मकर- कुटुंबाला जास्त वेळ द्या. गरज पडल्यास कुटुंबासाठी काही तडजोडी कराव्या लागतील. प्रेम करणाऱ्यांसाठी चांगला दिवस. भविष्यात होणाऱ्य़ा फाय़द्य़ांची चाहूल लागेल. 


कुंभ- जुन्या अडचणी दूर होतील. घर, कुटुंब, मुलंबाळं यांच्या बाबतीत काही चांगले बदल होतील. जवळच्या व्यक्तींशी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल. गुंतवणूकदार काही बेत आखतील. काही लोकांशी प्रदीर्घ संवाद होईल. गप्पा- गप्पांमध्ये कोणा एका व्यक्तीशी तुमचं नातं दृढ होईल. तारे व्यापारात त्यांची कामं बजावण्यास सुरुवात करणार आहेत. 


मीन- कोणताही बेत न आखता मोठी कामं होतील. नात्यांमध्ये मोठ्या बदलांची चिन्हं. मनीचे भाव व्यक्त करत लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. 


- दीपक शुक्ला