मेष (Aries) : शुक्रवारी तुमचा आत्मविश्वास वाढेल. राजकीय किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल. ज्यामुळे तुमचा आदर आणि सन्मान वाढेल.  कठीण समस्यांवर मार्ग काढाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ (Taurus): शुक्रवारी, तुम्हाला सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे लाभ मिळू शकतात. जर तुम्ही वेळेत संधीचा पुरेपूर वापर केला तर तुमचे व्यावसायिक जीवन तुम्हाला खूप फायदे देऊ शकते.


मिथुन (Gemini): तुमचा शुक्रवारचा संपूर्ण दिवस उत्साहात जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तसंच तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. तुमचा दिवस चांगला जाईल. 


कर्क (Cancer) :  शुक्रवारचा दिवस तुमचा आनंदाने सुरू होणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीत चांगले पैसे मिळतील. त्याचप्रमाणे प्रमोशन होण्याचीही चिन्हं आहेत. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. 


सिंह (Leo) : हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान नाही. भावंडांशी झालेल्या वादामुळे कौटुंबिक जीवनात अस्थिरता येऊ शकते. प्रेमसंबंध तसेच राहतील. जर तुम्ही  मेहनतीने वरिष्ठांना संतुष्ट करू शकत असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळू शकेल.


कन्या (Virgo): शुक्रावारी तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगलं यश मिळणार आहे. तुमचा पैसा योग्य कामात खर्च होईल. विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. 


तूळ (Libra) : कौटुंबिक जीवन चढ-उतारांनी भरलेलं असण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला दिवस जाईल.


वृश्चिक (Scorpio) : तुम्ही उत्साहाने भरलेले दिसणार आहात. नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, त्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे.


धनू (Sagittarius) : शुक्रवारी तुमचे आरोग्य चांगले राहील. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. याव्यतिरिक्त, उत्पन्नात वाढ शक्य आहे.  तुमची सामाजिक स्थिती सुधारेल आणि तुमचे समाधान वाढेल. नातेवाईक आणि मित्रांशी तुमचे संबंध सुधारतील.


मकर (Capricorn) : व्यावसायिक संबंध आणि व्यवसायाच्या संदर्भात व्यवहार करण्यासाठी हा उत्तम कालावधी आहे. कामाशी संबंधित  सहकार्य येत्या काही महिन्यांत सकारात्मक परिणाम देतील. प्रभावशाली लोकांशी संबंध प्रस्थापित करू शकतात. प्रेमप्रकरणात तुम्ही भाग्यवान असाल.