मेष : नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. नवीन ध्येय ठेवण्यासाठी दिवस चांगला आहे. उत्पन्न वाढीसाठी केलेले प्रयत्न आता यशस्वी होताना दिसतील. जुन्या कर्जातून सुटका होईल. व्यापार करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत खास दिवस आहे. नफा होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांच्या कानावर येत्या काही दिवसात चांगली बातमी येईल. आरोग्याकडे लक्ष द्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : कुटुंब आणि प्रेमात समजदारी दाखवावी लागेल. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. नोकरी क्षेत्रात प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. अनेक अडकलेली कामे पूर्ण होतील. कोणत्या रिसर्च प्रोजेक्टवर काम कराल. व्यापार करणाऱ्या लोकांनी प्रामाणिक रहाण्यााची गरज आहे. वेळेत सर्व जबाबदाऱ्या पार कराल. 


मिथुन: व्यवसायिक कामामुळे आज तणावात राहाल. पण सगळ मार्गी लागेल.  कामावर लक्ष केंद्रित करा. आज तुम्ही सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाकडे विशेष लक्ष द्याल. आज तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस एखादा मोठा छंद पूर्ण करण्यात घालवू शकता. मुलांकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहेत. व्यवसायात नफा मिळू शकतो. बेरोजगारांना इच्छित नोकरी मिळू शकते.


कर्क : कामाकडे लक्ष द्या. इतर व्यक्ती तुमच्या मार्गी अडथळा म्हणून येतील. व्यापार करणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याची नितांत गरज आहे. तरुणांनी दुसऱ्यांच्या वादात मध्यस्थी करण्याची गरज नाही. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन सकारात्मक असेल. मित्रांच्या मदतीने रखडलेली कामं पूर्ण होतील.  कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमची समाजात प्रतिष्ठा वाढवेल. कोणत्याही प्रॉपर्टी डीलरसाठी रविवार लाभदायक आहे. वायफळ खर्च करू नका.


सिंह: दुसऱ्यांच्या म्हणण्याकडे लक्ष द्या. अधिकाऱ्यांसोबत खास ओळखी होतील. अनावश्यक खर्चात कपात करा. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. मेहनतीचं फळ गोड मिळेल. तुमचा दिवस चांगला जाईल. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. आरोग्याकडे लक्ष द्या.  स्वतःसाठी थोडा वेळ काढा. ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. 


कन्या : तुम्ही तुमच्या प्रतिभेने लोकांना प्रभावित कराल. जर तुम्ही हुशारीने काम केलं तर तुम्ही अधिक पैसे कमवू शकता. घरातील कार्यालयीन काम करणाऱ्या लोकांमुळे वरिष्ठ आनंदी राहतील.  विद्यार्थी परीक्षेत चांगली कामगिरी करतील पण मनात भीती राहील. कोणत्याही गोष्टीला न घाबरता, सर्व अडचणींवर मात करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा. 


तूळ: तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं लगेच फळ मिळेल. मुलांसाठी तुम्ही कोणतीही गुंतवणूक करू किंवा मालमत्ता घेऊ शकता. तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तर नशिबाची साथ आज तुम्हाला लाभणार आहे. अचानक धनलाभ होवू शकतो.  एवढंच नाही तर अडकलेले पैसे देखील मिळू शकतात. 


वृश्चिक : रविवार तुमच्यासाठी खूप चांगला परिणाम देणारा आहे. इतरांचे सहकार्य मिळणं तुम्हाला सोपं असेल. नवीन कपडे किंवा काही घरगुती वस्तू महिला खरेदी करू शकतात. तुम्ही उत्साहाने भरलेले दिसणार आहात. नशीब तुमच्या सोबत आहे. कामात उत्साह दिसून येईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा ओळखीच्या व्यक्तीला भेटाल, त्यामुळे तुम्हाला आनंद होणार आहे.


धनु : रविवारचा दिवस तुमच्यासाठी शांततापूर्ण राहील. तुम्ही तुमच्या व्यापार व्यवसायात बुद्धीचा वापर कराल म्हणजे तुमचं काम बिघडण्यापासून वाचेल. पैशाची तुमची चिंता दूर होऊ शकते. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही केलेल्या कोणत्याही कामाचं लगेच फळ मिळेल. मुलांसाठी तुम्ही कोणतीही गुंतवणूक करू किंवा मालमत्ता घेऊ शकता.


मकर : दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. सामाजिक क्षेत्रात तुमची आवड वाढण्याची चिन्हं आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन कल्पना मांडू शकता. व्यवहाराशी संबंधित कामे पूर्ण करू शकाल.


कुंभ : रविवार तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न कराल. परिश्रमाचे अनुरूप लाभ न मिळाल्याने निराशा होऊ शकते.


मीन : रविवारी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तर नशिबाची साथ आज तुम्हाला लाभणार आहे. अचानक धनलाभ होवू शकतो.  एवढंच नाही तर अडकलेले पैसे देखील मिळू शकतात.