Horoscope : `या` राशींच्या कुंडलीत धनलाभाचा योग, तर कामात मिळेल नशिबाची साथ
मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या आठवड्यातील मंगळवार काही राशींच्या लोकांसाठी धनलाभ घेऊन आलाय. पाहूयात मेष ते मीन राशींसाठी 10 डिसेंबरचा दिवस कसा असणार आहे.
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस शांतेत जाणार आहे. मानसिकरित्या तुम्ही मजबूत असणार आहे. घरातील वातावरण भविष्येचा चिंतेत असणार आहे. कार्य क्षेत्रात नवीन उर्जा असणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
आजचा दिवस चांगला असणार आहे. सरकारी कार्यात खर्च होणार आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. शुक्र देवाची कृपा तुमच्यावर असणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. प्रवासाचे योग कुंडलीत आहे. मात्र आरोग्याकडे लक्ष द्या.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस चढ उताराचा असणार आहे. घरात प्रसन्न वातावरण असणार आहे. व्यावसायिकांनी आज विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.
सिंह (Leo Zodiac)
आज तुम्ही अध्यात्मात राहाल. सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमची हिम्मत आणि शौर्य तुमच्यावर असलेल्या कामांना चालना देईल.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक ठरेल काम करा आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
तूळ (Libra Zodiac)
धार्मिक कार्यात रुची राहील. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून कोणालाही काही सांगू नका. आनंदी जीवनासाठी, घरातील वातावरण अनुकूल असणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. नोकरी वाढीसाठी वेळ चांगला आहे. तुमची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी योगासने करा. तुमच्या दैनंदिन कामात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
धनु (Sagittarius Zodiac)
आज तुमचा मन प्रसन्न राहील, प्रवासात वाढ होण्याची शक्यता आहे. वेळ वाया घालवू नका, देवी भगवतीच्या चरणी प्रार्थना करा.
मकर (Capricorn Zodiac)
आज आर्थिक बाबतीत सावध राहा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवा. शुक्राच्या कृपेमुळे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. अचानक धनलाभ होणार आहे. जोडदाराबद्दल तुम्ही चिंतेत असणार आहात. नवीन प्रकल्पात यश मिळेल. समाजात मान सन्मान वाढणार आहे. संगणक जास्त वेळ घेऊ शकतो, काळजी करण्याची गरज नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि मगच तुम्हाला फायदा मिळेल.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानत्मक असणार आहे. संयम आणि धैर्याने पुढे जा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नोकरदार लोकांना धनलाभाचे योग आहेत.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)