Horoscope 16 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला मिळेल. तुम्हाला कुटुंबीयांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. करिअर करण्याची चांगली संधी आहे.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी ऑफिसमध्ये जास्त कामामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊ शकतो. तुमचे कौटुंबिक जीवन थोडे त्रासदायक असेल.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर सल्लागाराशिवाय कोणतीही गुंतवणूक करू नका. तुम्हाला आर्थिक संकटाचाही सामना करावा लागू शकतो. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी मेहनतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात सन्मान मिळू शकेल. तुमच्या अडचणीत तुमचे कुटुंब तुमच्या पाठीशी उभे राहतील.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. तुमच्या कुटुंबातील काही समस्यांमुळे तुमचा तणाव वाढू शकतो. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुमच्या मनातील गोष्टी आज तुम्ही कुटुंबात शेअर करू शकता. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद होण्याची शक्यता आहे.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींनी वैवाहिक जीवनासाठी वेळ काढावा. बेरोजगारांनी नशिबावर विसंबून राहू नये, नोकरीसाठी प्रयत्न सुरू ठेवा. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी जास्त कामाचा ताण असल्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. प्रवासाची कोणतीही योजना करत असाल तर ते पुढे ढकलले जाऊ शकते.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायातील तुमचा अनुभव तुम्हाला यश मिळवून देईल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कुटुंबातील सर्वांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमच्या जोडीदाराचं महत्त्व समजून घ्या. सर्व कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी विचार न करता व्यवसायात केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी तोट्याचा सौदा ठरेल. नकारात्मक विचार तुमच्यासाठी सामाजिक स्तरावर समस्या निर्माण करू शकतात. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी आर्थिक परिस्थिती देखील मजबूत राहील. तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )