Horoscope 20 March 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढू शकणार आहे. अनिश्चित गोष्टींमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणात्मक राहणार आहे.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी एखाद्या चुकीच्या प्रकरणात गुंतले जाण्याची शक्यता आहे. व्यापारात आर्थिक नुकसान होण्याची चिन्ह आहेत.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी धन प्राप्तीत वाढ होणार आहे. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरू शकणार आहे. कलाकारांना संधी चांगली मिळणार आहे.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी तुमची सर्व काम यशस्वी होणार आहेत. दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. वादविवाद टाळाणं गरजेचं आहे. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी शक्यतो दुरवरचे प्रवास टाळले पाहिजेत. कुटुंबाकडून सहकार्य लाभणार नाही, त्यामुळे सर्व बाबी लक्षात घ्या.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी रागाचा अतिरेक करणं तुम्ही टाळलं पाहिजे. शारिरिक आरोग्याबाबत काही समस्या उद्भवू शकता.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना नोकरीत मनासारखी बढती मिळणार आहे. जवळच्या व्यक्तीशी असलेलं भांडणं संपुष्टात येणार आहे.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नोकरीमध्ये केलेल्या कामाचं महत्त्व वाढणार आहे. नव्या कामकाजासाठी शुभदिवस असणार आहे


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाचं लेखन करा. इच्छूक व्यक्तींचं लग्न ठरणार आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी ताणतणावामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात विवाद टाळणं फायदेशीर ठरेल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी वरिष्ठांकडून कामाची अपेक्षा वाढू शकते. रोजगारात आर्थिक उन्नती होणार आहे. शेअर्समधील गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी विरोधकावर मात करण्यात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही काळजी घ्या.