Horoscope 20 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी व्यवसायात काही नुकसान होऊ शकते. काही विषयांवर तुमचे तुमच्या मित्रांशी किंवा नातेवाईकाशी वाद होऊ शकतात.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी काही नवीन कामाची सुरूवात करू शकता. करिअर आणि नोकरीमध्ये तुम्हाला प्रगतीच्या संधी आहेत. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी पैशांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या संधी मिळतील. व्यवसायात प्रगती करण्याची शक्यता आहे. काही लोकांशी संबंध बनवण्याचा आणि ते आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करा.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी काही गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. पैसे कमवण्याच्या नव्या संधी मिळतील.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी जास्तीत जास्त कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणशी संबंधित काही गोष्टींचा उलगडा होईल.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी पैशांशी निगडीत अडचणी दूर होतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. अनेक वादांवर तोडगा निघेल. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना शुभकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. साथीदारासाठी एखादा लहानमोठा बेत आखाल. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी संधी मिळाल्यास थोडा आराम करा. कामाच्या बाबतीत तुमची इतरांशी चर्चा होईल. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी कोणा एका व्यक्तीला अचानक भेटण्याची संधी आहे. जुन्या गुंतवणुकीची संधी मिळेल. कुटुंब आणि समाजाकडून आदर मिळेल. 


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी करिअरच्या वाटेवरही नव्या संधी मिळतील. कोणत्याही कामात टाळाटाळ करु नका. मन आणि बुद्धीवर नियंत्रण ठेवा. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी कोणतंही मोठं काम हाती घेण्यापूर्वी विचार करा. परिस्थिती बदलण्याची संधी तुमच्यापुढं चालून येणार आहे.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी बेरोजगारांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. जुनी कामं मार्गी लागतील. दैनंदिन कामं पूर्ण होतील. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )