Horoscope 23 July 2023 : `या` राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामं मार्गी लागतील!
आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Horoscope 23 July 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी मनाचा दाखवलेला मोठेपणा नातेसंबंधातील तेढ कमी करणारा ठरेल. देवयात्रा व तिर्थक्षेत्री प्रवास कराल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी उत्पन्नापेक्षा अधिक खर्च कराल. पूर्वी घेतलेला निर्णय चुकीचा ठरण्याची शक्यता आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी काम करणाऱ्या लोकांना ट्रान्सफर लेटर मिळू शकेल. मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी व्यापाऱ्यांनी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नये. परीक्षेला बसलेल्यांना यश मिळण्याची शक्यता आहे.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी प्रोजेक्ट रिसर्चवर काम करणं फायदेशीर ठरेल. कोणत्याही सन्मानीत व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी काळजीपूर्वक व्यवहार करा. कोणताही टोकाचा विचार किंवा अतिरेकी वृत्ती टाळा. स्थावर संपत्तीचे वाद मिटण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींचे भावंडांबरोबर बरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या प्रयत्नाने समाजात मान मिळेल.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रवास शक्यतो टाळावा. प्रेमसंबंधात जोडीदारांकडून भेटवस्तु मिळतील.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होईल. व्यापारिक वाद संपुष्टात येतील. समारंभाच्या निमित्ताने प्रियजनांची गाठभेट होईल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी पत्नीसोबत आर्थिक विषयावर वाद होण्याची शक्यता आहे. अचूक मेहनत करूनही फळ कमी प्रमाणात मिळेल.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी मानसिक अस्थिरतेचा परिमाण रोजगारात जाणवेल. मुलांच्या बाबतीत काही विशेष कठोर निर्णय घ्यावे लागतील.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी गुपित गोष्ट जवळच्या व्यक्ती शिवाय कोणालाही सांगू नका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )