मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक रहावं. नोकरीच्या ठिकाणी बदल होऊ शकतात. मित्रांशी बोलताना जपून बोला कारण विचारांचे मतभेद होऊ शकतात. कुंटुंबात आनंद आणि शांती असेल.


वृषभ


नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अतिरीक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला गरज असलेल्या गोष्टीमध्ये मित्रांचं सहकार्य लाभणार आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे.


मिथुन


नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळणार आहे, मात्र कामाच्या ठिकाणी तुम्हाला त्रास होण्याचीही शक्यता आहे. अतिप्रमाण उत्साही होणं टाळा. 


कर्क


एखादी व्यक्ती तुमचं मन दुखवू शकते. आजच्या दिवशी तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही करत असलेल्या महत्त्वाच्या कामांमध्ये कुटुंबाचं सहकार्य मिळणार आहे.


सिंह


आजच्या दिवशी तुम्हाला नोकरीत सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. शिवाय चांगली बातमी मिळणार असून उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करू शकता.


कन्या


आजच्या दिवशी तुम्हाला मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी इतर लोकांशी तुमची वादावादी होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आरोग्याची काळजी घ्या.


तूळ


आजच्या दिवशी तुमच्या व्यवसायात जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. भावंडांशी तुमचं मतभेद होऊ शकतो. जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर रागावर नियंत्रण ठेवा


वृश्चिक


तुमच्या कुटुंबामध्ये धार्मिक कार्य होणार आहे. कपड्यांवरील खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत तुमचे मतभेद होऊ शकतात.


धनू


आजच्या दिवशी तुमचं मन अस्वस्थ राहणार आहे. कामामध्ये तुम्हाला वडिलांचं सहकार्य लाभणार आहे. तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा येईल. तुमचा आत्मविश्वास वाढू शकणार आहे.


मकर


मनात विचित्र भावना येऊ शकतात. काहीही खाताना किंवा पिताना काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा कारण खर्च वाढण्याची शक्यता आहे.


कुंभ


नोकरीमध्ये जास्त व्याप वाढू शकतो. कौटुंबिक समस्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. तुम्हाला प्रत्येक कामामध्ये भावंडाचं सहकार्य मिळू शकतं.


मीन


आजच्या दिवशी तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या टाळू नका. वाहनावर खर्च वाढू शकतो.