मुंबई : आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल याची माहिती घेऊया. जाणून घ्या तुमचं आजचं राशीभविष्य.


मेष (Aries)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष राशीच्या लोकांना सोमवारी नशिबाची साथ मिळेल. या काळात विवाहित जीवनाचा आनंद तुमच्यासाठी चांगला असेल. तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. कुटुंबासोबत आपुलकी तसंच चांगला वेळ घालवाल.


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी वाद टाळावे. तुमच्या उत्कृष्ट व्यक्तिमत्वामुळे आणि व्यवहार कौशल्यामुळे सामाजिक कार्यात तुमची प्रतिभा लोकांसमोर येईल. स्थान परिवर्तनाशी संबंधित हा चांगला योग बनत आहे. 


मिथुन (Gemini)


तुमचा दिवस खूप तणावपूर्ण जाणार आहे. तुमच्या स्वभावात गांभीर्य आणि एकाग्रतेची झलक येईल. तुम्ही कुटुंबासमवेत काही क्षण आरामात घालवाल.


कर्क (Cancer)


आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कर्क राशीच्या व्यक्ती आकौटुंबिक आणि व्यावसायिक कामांमध्ये चांगले संतुलन राखू शकतील. यावेळी आर्थिक नफाही महत्त्वाची शक्यता बनत आहे. 


सिंह (Leo)


धार्मिक कारणांनी एखाद्या प्रवासाला जाऊ शकता. आरोग्यासंदर्भातील तक्रारी सतावतील. आपल्या लोकांसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. 


कन्या (Virgo)


दिवसाची सुरुवात चांगल्या बातमीने होणार आहे. कामामध्ये चांगला आर्थिक लाभ होईल. तुम्ही पैसे वाचवू शकता. विद्यार्थी त्यांचं लक्ष अभ्यासावर केंद्रित करतील.


तूळ (Libra)


अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आज मन प्रसन्न असेल. व्यापारात गुंतवणूक करा. नोकरी करण्यासाठी एखादी नवी संधी चालून येईल. 


वृश्चिक (Scorpio)


दिवस चांगला सुरू होणार आहे. मित्र किंवा कुटुंबियांसह तुमचा चांगला प्रवास होईल. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला चांगली परिस्थिती असेल. घर-कुटूंब किंवा कोणत्याही नातेवाईकाच्या ठिकाणी मांगलिक कार्यक्रमात भाग घेण्याची संधी असेल.


धनु (Sagittarius)


दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे, तुम्ही जे काही काम करता त्यामध्ये तुम्हाला साथ मिळेल. तुमच्या मेहनतीच्या आणि अथक प्रयत्नांचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. अपेक्षेप्रमाणे कुटुंबाचा आनंद मिळणार आहे.


मकर (Capricorn)


अडकलेले आणि बुडालेले पैसे परत मिळणार आहेत. अनेक अडचणींवर तोडगा निघणार आहे. आज लग्नासाठीचे काही नवे आणि तुमच्या पसंतीस पडणारे प्रस्ताव येणार आहेत. 


कुंभ (Aquarius)


आपल्या हुशारीने तुम्ही कामात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचं सिनियर्स कौतुक करतील. आपला दिवस चांगला जाणार आहे. स्फुर्तीने तुम्ही आपले प्रत्येक कार्य अगदी सहजपणे पूर्ण कराल.


मीन (Pisces)


तुम्ही तुमच्या कामात उत्तम कामगिरी कराल म्हणजे तुम्हाला चांगला नफा मिळेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढताना दिसेल. आपल्या जोडीदाराकडून आणि मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. पैसा मिळण्याचा योग आहे.