Horoscope 27 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी वडिलांचा आशीर्वाद घेतल्यास तुमच्या सर्व कार्यात नक्कीच यश मिळेल. करिअरमध्ये नवीन सुरुवात करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी मित्रांसोबत कुठेतरी जाण्याचा बेत बनवाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळेल.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे टाळा. तुमची कामे करताना सावधगिरी बाळगावी लागेल. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी कुटुंबियांसोबत धार्मिक स्थळी जाण्याचा बेत करा. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. अधिकार्‍यांशी बोलत असताना शब्द काळजीपूर्वक वापरा. 


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करायची असेल तर ही वेळ चांगली आहे. कुटुंबात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.  


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना मित्रांचे सहकार्य मिळेल. अपेक्षित कामांना विलंब होऊ शकतो. जे घरापासून दूर व्यवसाय करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. 


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. एखाद्याला पैसे दिले असतील तर तेही तुम्हाला परत करावेत. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी नोकरीत अधिकार वाढू शकतात. तुम्ही केलेल्या कामामुळे वरिष्ठ खूप खूश होतील. करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी दुसऱ्याच्या सांगण्यावरून कोणतीही गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुमचे वैवाहिक जीवन आजच्या दिवशी कठीण असू शकतं.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल खूप आनंदी असाल. नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसह चांगला वेळ घालवू शकता.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी संध्याकाळचा वेळ मित्रांसह चांगला जाईल. नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. अविवाहित लोकांना लवकरच आनंदाची बातमी मिळेल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )