Horoscope 28 February 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज तुम्ही कुठल्या शुभ कार्यासाठी बाहेर जाणार आहात. वाहन चालवताना काळजी घ्या.वादग्रस्त परिस्थितीपासून दूर राहा. ओळखीच्या व्यक्तीकडून तुमचा अपमान होऊ शकतो. 


वृषभ (Taurus Zodiac) 


संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर तुम्ही नवीन वाहन खरेदी करु शकता. कुटुंबात नवीन पाहुण्याची चाहुल लागणार आहे. नवीन कामाची मोठी ऑफर मिळणार आहे. कुटुंबात शुभ कार्य ठरेल.


मिथुन (Gemini Zodiac)


आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मन स्थिर आणि प्रसन्न राहणार आहे. वाणीच्या प्रभावामुळे तुमची प्रलंबित कामं मार्गी लावणार आहात. पत्नीच्या तब्येतीची काळजी तुम्हाला अस्वस्थ करणार आहे. 


कर्क (Cancer Zodiac)  


आजचा दिवस विचारपूर्वक काम करा. कामाबद्दल कुठलाही मोठा निर्णय घेऊन नका. नवीन भागीदारी करताना सावधगिरी बाळगा. वाहन चालवताना काळजी घ्या. 


सिंह (Leo Zodiac) 


आज तुमचे आरोग्यकडे लक्ष द्या. डॉक्टरांची पायरी चढावी लागणार आहे. व्यापार-व्यवसायात सहकाऱ्यांपासून सावध राहा, अन्यथा तुमचं काम बिघडणार. आज कोणतेही नवीन व्यवहार करू नका. वाहने चालवताना काळजीपूर्वक चालवा. 


कन्या (Virgo Zodiac)    


आज तुमचे मन अशांत असणार आहे. व्यापार-व्यवसायात नुकसान सहन करावं लागणार आहे. काही मोठे काम हाताबाहेर जाणार आहे. आज तुम्ही कौटुंबिक मतभेदांमध्ये अडकू नका. आज तुम्ही व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका. 


तूळ (Libra Zodiac)  


आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करु शकता. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे सहकार्य लाभणार आहे. कुटुंबात शुभ कार्यक्रम होणार आहे. नवीन वाहन आणि घर खरेदी करण्याचा योग आहे. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)  


आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत चिंतेत असणार आहात. आई-वडिलांची तब्येत अचानक खराब होऊ शकते. व्यापार-व्यवसायात आज तुम्हाला सहकाऱ्यांचे सहकार्य मिळतात. आज तुम्ही काही मोठे काम सुरू केल्यास बाप्पाचा आशिर्वाद लाभणार. 


धनु (Sagittarius Zodiac) 


आज वाहने काळजीपूर्वक चालवा. ज्या कामाबद्दल मी खूप दिवसांपासून विचार करत होतो. ते काम आज मार्गी लागणार आहे. कोर्टाच्या कामात नुकसान होणार आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 


मकर (Capricorn Zodiac)  


आज तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे. कुटुंबात शुभ कार्यक्रम होणार आहे. व्यापार-उद्योगात कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यासाठी शुभ दिवस आहे. पत्नीची तब्येत खराब होण्याची शक्यता आहे. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करु शकता. कामाच्या ठिकाणी भागीदारांकडून चांगले सहकार्य मिळाल्याने कामाच्या ठिकाणी फायदा होणार आहे. पत्नीच्या घरच्यांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. 


मीन  (Pisces Zodiac)  


आज तुमचं आरोग्य नरमगरम असणार आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे तुम्ही अडचणीत येणार आहात. मुलांची चिंता सतावणार आहे. व्यापार-व्यवसायात सहकाऱ्यांशी मतभेद वाढणार आहेत. कौटुंबिक वादापासून दूर राहा. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)