Horoscope 28 March 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी  नशीबाची साथ असणार आहे. सोप्या पद्धतीने कोणतीही गोष्ट मिळवू शकाल. आज स्वत: निर्णय घेण्याऐवजी इतरांची मदत घ्या. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी सर्वबळाने एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करा. विचार करणं बंद करा आणि या प्रवासाला निघा.


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी विश्वाच्या नव्या प्रवाहाची तुम्हाला माहिती मिळेल. अनपेक्षितपणे एखाद्या व्यक्तीकडून समर्थन मिळेल. 


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी कोणाला गरज भासल्यास त्यांची मदत करा. एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर आज योग्य वेळ आहे.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी इतरांना समजून घेण्यात तुम्ही कुठेतरी कमी पडाल. आपले ध्येय साध्य करण्यासाठी कार्य पूर्ण कराल याची खात्री करा.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी एखादं असं काम कराल ज्याचा फायदा तुम्हाला दीर्घ काळासाठी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात कराल. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना व्यवहार चातुर्याचा फायदा होईल. धनलाभाची शक्यता आहे. अधिक काळ चालणाऱ्या कामातून फायदा होईल.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी कामात तुम्हाला फायदाच होणार आहे. पैशांच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. एखादं महत्त्वाचं काम हाती घ्याल. 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने प्रगती कराल.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी नव्या विचारांवर योजना आखाल. अवघड गोष्ट सोपी करण्याचा प्रयत्न करा. योग्य तो निर्णय घेतल्याने ते तुमच्या फायद्याचे ठरेल. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी वैयक्तिक व्यवसाय करणे उत्तम राहील. स्वत: काही नियमांचे पालन करा. यश तुमचेच आहे. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नोकरी किंवा व्यापाराच्या बाबतीत अती घाई करु नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणा एका नव्या व्यक्तीशी संवाद साधाल.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )