Horoscope 4 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी पैशांशी संबंधित कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर थोडा विचारपूर्वक विचार करा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळणं कठीण आहे. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकते. नोकरीत अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील ज्या तुम्ही नीट पार पाडणं गरजेचं आहे. 


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी तुम्हाला नवनवीन संधी मिळत राहतील. तुम्हाला मालमत्तेशी संबंधित काही समस्या असू शकतात.   


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी मुलाच्या बाजूने तुमचे मन प्रसन्न राहील. वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 


सिंह (Leo)


आजच्या दिवशी मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो.  कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.  


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते. 


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार जाणवतील. एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या संधीही मिळतील.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता ऐकायला मिळेल. नातेवाईकाकडून नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल 


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी विद्यार्थ्यांना शिक्षकांचेही सहकार्य मिळेल. नोकरदार लोक नोकरीबरोबर काही व्यवसाय करण्याची योजना आखतील.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचाही फायदा मिळेल. जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल.


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी ऑनलाइन काम करतायत त्यांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. वरिष्ठांशी बोलताना बोलण्यात गोडवा ठेवा.


मीन (Pisces)


आजच्या दिवशी नोकरीत पदोन्नतीच्या संधी उच्च अधिकार्‍यांकडून मिळतील. जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )