Horoscope 9 March 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष (Aries)


आजच्या दिवशी कर्जातून मुक्त होण्यासाठी मदत आणि मार्ग सापडणार आहे. अडकलेली प्रकरणं मिटणार आहेत. कोणती तरी नवी जबाबदारी मिळू शकणार आहे. 


वृषभ (Taurus)


आजच्या दिवशी फायदेशीर प्रवास होण्याचे योग आहेत. नोकरीत प्रगती होण्याची चिन्ह आहेत. जुन्या काळात तुम्ही कोणाला जास्त मदत केली असेल तर अचानक त्याचा फायदा होईल


मिथुन (Gemini)


आजच्या दिवशी तुमच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातील स्थिती सर्वांसमोर अजिबात सांगू नका.


कर्क (Cancer)


आजच्या दिवशी तुम्हाला कामकाजात संपूर्ण सावध राहावं लागणार आहे. पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळणार आहे. महत्त्वाच्या लोकांशी तुमच्या भेटी होणार आहेत.


सिंह (Leo)


आजच्या दिवशी तुमची महत्त्वाची कामं देखील पूर्ण होणार आहेत. आज खूप काम करावं लागू शकतं पण कामामुळे घाबरू नका.


कन्या (Virgo)


आजच्या दिवशी वायफळ खर्च वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामात घाई करू नका. सावधगिरी बाळगावी लागणार आहे.


तूळ (Libra)


या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळणार आहे. व्यवसायातील निर्णय भावानिक होऊन घेऊ नका. कुटुंबीयांसोबत नातेसंबंध अधिक मजबूत होऊ शकतात.


वृश्चिक (Scorpio)


आजच्या दिवशी नोकरी किंवा कामानिमित्त मोठ्या लोकांशी अर्थपूर्ण चर्चा कराल. व्यवसायात येणाऱ्या अडचणी संपुष्टात येणार आहेत.


धनु (Sagittarius)


आजच्या दिवशी कोणत्याही कामाचा अतिरेक करू नये. येणाऱ्या काही दिवसांत यश मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराची साथ मिळणार आहे.


मकर (Capricorn)


आजच्या दिवशी कामामध्ये येणारे अडथळे तुमचा त्रास वाढवू शकतात. जोडीदार तुम्हाला आर्थिक मदत करु शकतो. विचार करुनच निर्णय घ्यावा लागणार आहे. 


कुंभ (Aquarius)


आजच्या दिवशी ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. तुमचं प्लानिंग गुप्त ठेवा ते कोणासोबत शेअर करु नका. पोट दुखीचे आजार होऊ शकतात. 


मीन (Pisces)


आजच्या दिवशी विचार केलेली कामं पूर्ण न झाल्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. नेहमीच्या कामांतून काही वेळासाठी विश्रांती मिळू शकेल.