मुंबई : जन्मापूर्वी 9 महिन्यापर्यंत व्यक्ती गर्भात असतो, त्याच पद्धतीने मृत्यूच्या 9 महिने आधीपासून व्यक्तीच्या शरीरात बदल होतात. मात्र तुम्हाला माहितीये का? अनेकदा हे बदल मृत्यू येण्याचे संकेत असतात. वेळेनुसार मृत्यूचे जवळ येत असताना अनेक गोष्टी घडतात. जे व्यक्तीला एकदम वेगळा अनुभव देतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृत्यूंबाबत पुराणांमध्ये याबाबत सविस्तर लिहण्यात आलं आहे. जर एखाद्या व्यक्तीने या संकेतांकडे लक्ष दिलं तर, तर मृत्यूबाबत माहिती मिळण्यास मदत होईल.


मृत्यूचे संकेत


  • शिवपुराणा नमूद केल्याप्रमाणे, मृत्यूच्या काही महिने अगोदर माणसाची जीभ नीट काम करणं बंद करते. यामुळे त्या व्यक्तीला जेवणाची योग्य चव मिळत नाही. शिवाय बोलण्यातही त्रास होऊ शकतो.

  • एखाद्या व्यक्तीला चंद्र, सूर्य आणि अग्नीचा प्रकाश पाहण्यास असमर्थता जाणवू लागते. हा संकेत असतो तो म्हणजे आयुष्यातील काही वेळ शिल्लक आहे. असं मानलं जातं की, मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्ती चंद्र आणि सूर्य सामान्यपणे पाहू शकत नाही.

  • शिवपुराणातील भगवान शंकरानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा रंग फिकट पिवळा किंवा पांढरा होऊ लागतो. हे संकेत आहेत ते म्हणजे, त्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आला आहे.

  • जर एखाद्या व्यक्तीला सावली दिसत नसेल तर तो मृत्यूचा संकेत मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यावेळी एखाद्या वृद्ध व्यक्तीला सावली दिसत नाही तेव्हा त्या व्यक्तीचा लवकरच मृत्यू होतो.

  • ज्योतिषशास्त्रात नमूद केल्यानुसार, ज्या व्यक्तीला तोंड, जीभ, डोळे, कान आणि नाक दगडासारखे जाणवू लागतात, तर ते व्यक्तीच्या मृत्यूचं लक्षण मानलं जातं. 


(टीप : वरील सर्व गोष्टी झी 24 तास केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतंय. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)