Dev Uthani Ekadashi 2022: आज एकादशीला याचे दान करा, जीवनात सुखाबरोबर भरभराट
Kartiki Ekadashi 2022 : हिंदू धर्मात दान करणे हे महत्वाचे मानले जात आहे. मात्र, हे दान एकाद्या विशिष्ठ दिवशी केले तर त्याचे फायदेही चांगले मिळतात, असे सांगितले जाते. आज देवउठनी एकदशी आहे. यादिवशी दान केले तर जीवनात अनेक चांगल्या गोष्टी घडतात.
Dev Uthani Ekadashi 2022: आज देवउठनी एकादशी आहे. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये याला खूप महत्त्व आहे. अनेक ठिकाणी याला प्रबोधनी एकादशी ( Prabodhini Ekadashi ) किंवा देवोत्थान एकादशी असेही म्हणतात. असे मानले जाते की देवशयनी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू 4 महिने योगनिद्रात जातात आणि देवउठनी एकादशीच्या दिवशी जागे होतात. या चार महिन्यांत कोणतेही शुभ कार्य होत नाही. असे मानले जाते की देवउठनी एकादशी हा दिवस आहे, ज्या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि पृथ्वीची जबाबदारी घेतात.
या दिवसाला का महत्व प्राप्त झालेय?
या दिवसापासून हिंदू धर्मानुसार सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह केला जातो ( Tulsi Vivah on seocnd day of dev uthani ekadashi ). यानंतर विवाह सोहळ्यासारखी शुभ कार्ये केली जातात. हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवसापासून हिंदू धर्मानुसार सर्व शुभ कार्याला सुरुवात होते. देवउठनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह केला जातो. यानंतर विवाह सोहळ्यासारखी शुभ कार्ये केली जातात. देवउठनी एकादशी दरवर्षी कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. यावेळी एकादशी 3 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजता सुरु झाली आणि 4 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:08 वाजता संपेल. उदयतिथीनुसार देवूथनी एकादशीचे व्रत 4 नोव्हेंबर 2022 रोजी ठेवण्यात येणार आहे.
काय आहे याचे महत्व?
हिंदू धर्मात दानधर्माला वेगळे महत्त्व आहे. पण देवउठनी एकादशीला श्रीनारायण त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतात आणि तुळशीविवाह कार्तिक द्वादशीला होतो. अशा प्रकारे देवउठनी एकादशीला दानाचे महत्त्व वाढते. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने भगवान विष्णूसह सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात.
काय दान करावे?
देवउठनी एकादशीला गावकरी आपल्या घराच्या अंगणात शेणाने सासरवतात आणि ते खूप पवित्र मानले जाते. या दिवशी अन्न आणि पैशांव्यतिरिक्त धान्य, मका, गहू, बाजरी, गूळ, उडीद आणि कपडे दान केले जातात. रताळे आणि ऊस दान करणे देखील चांगले मानले जाते. हे दान केल्याने घरात सुख-शांती राहते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)