Shukra Gochar 2023 : ग्रहांच्या राशीतील बदलाचा मानवी जीवनावर जीवनावर नक्कीच काही परिणाम होतो. मंगळवारी म्हणजेच 30 मे रोजी शुक्र चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक शास्त्रानुसार, शुक्र एखाद्याच्या कुंडलीमध्ये मजबूत स्थितीत असतो त्यावेळी सर्व क्षेत्रांमध्ये त्याचे फायदे मिळतात. दरम्यान यावेळी शुक्र कर्क राशीत प्रवेश करत असताना धन राजयोग तयार होताना दिसतोय.


कधी तयार होतो धन राजयोग?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शुक्र कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या भावात प्रवेश करतो किंवा तूळ किंवा मीन राशीमध्ये असतो त्यावेळी धन राजयोग तयार होतो. मुख्य म्हणजे ज्यावेळी हा योग तयार होतो, तेव्हा काही राशींच्या आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होण्याची दाट शक्यता असते.


यावेळी शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा कोणत्या राशींवर त्याचा चांगला प्रभाव पडणार आहे ते पाहूयात. यावेळी काही राशींना धन राजयोग लाभाची संधी मिळणार आहे. 


मिथुन रास


शुक्र यावेळी मिथुन राशीच्या दुसऱ्या घरात प्रवेश करणार आहे. या राशीच्या व्यक्तींना धन राजयोगाचा विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये भरपूर आर्थिक लाभ मिळणार आहे. यापूर्वी जर कुठे तुमचे पैसे अडकले असतील तर ते मिळू शकणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रचंड नफा मिळणार आहे. कुटुंबातील वातावरण चांगलं खेळीमेळीचं असणार आहे. 


कन्या रास


या राशीमध्ये शुक्र अकराव्या घरात प्रवेश करणार आहे. या काळामध्ये या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे यावेळी अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येणर आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यक्षमता दाखवण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. शुभ राजयोगाचा प्रभाव जीवनातही जाणवू शकतो. आर्थिक समस्या असतील तर त्या सुटू शकणार आहे. 


मकर रास


मकर राशीच्या सातव्या घरात शुक्राचं भ्रमण होणार आहे. त्यामुळे हा राजयोग केवळ आर्थिक नव्हे तर खासगी आयुष्यात देखील महत्त्वाचा ठरणार आहे. शुक्र या राशीसाठी सकारात्मक आहेय. त्यामुळे या कालावधीमध्ये भरपूर पैसे मिळू शकतील. एखाद्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठा नफा होण्याची शक्यता आहे. पत्नीशी संबंध चांगले राहणार असून एखादी चांगली बाती ऐकायला मिळू शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)