नवी दिल्ली : धनत्रयोदशी १७ ऑक्टोबरला आहे. सोने आणि चांदीचे भाव वाढले आहे. त्यामुळे अनेकांना सोनं खरेदी करताना दोनदा विचार करावा लागत आहे. पण अशा काही संस्था किंवा स्कीम आहेत ज्याद्वारे कमी भावात तुम्ही सोनं खरेदी करू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही सोन्याच्या नाण्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करायचा असेल तर अ‍ॅमेझॉन गोल्ड कॉईन्स देत आहेत. हे गोल्ड कॉईन कंपनी १० टक्के डिस्काऊंटने देत आहे. हे सोनं तुम्ही पुढीलपैकी कोणत्याही ब्रॅण्डमधून खरेदी करु शकता. Joyalukkas, मालाबार, Senco Gold, ब्लूस्टोन, पीएन गाडगील ज्वेलर्स, कामा ज्वेलरी आणि MMTC-PAMP. 


यासोबतच पेटीएमने यंदा ‘दिवाळी गोल्ड सेल’ आणला आहे. ज्यात ग्राहक धनत्रयोदशीला गोल्डफेस्ट प्रोमो कोडचा वापर करून कमीत कमी १० हजार रूपयांच्या खरेदीवर ३ टक्के अतिरिक्त पेटीएम गोल्ड मिळवू शकता. ग्राहक पेटीएम गोल्डमध्ये भारतातील एकमात्र आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त रिफायनरी एमएमटीसी-पीएएमपीमधून १ रूपयांपेक्षा कमी किंमतीत २४ कॅरेट ९९९.९ शुद्ध सोनं खरेदी करू शकता आणि हे सोनं तुम्ही सुरक्षीत लॉकर्समध्ये मोफत संग्रहीत करू शकता. 


ग्राहक लाईव्ह मार्केटच्या किंमतीत सोनं एमएमटीसी-पीएएमपीला विकू शकता किंवा सोन्याचे कॉईनच्या रूपात घरी डिलेव्हरी मिळवू शकता. काही ज्वेलर्सही स्वस्त सोन्याची ऑफर देत आहेत. जर तुमच्याकडे एचडीएफसीचं क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही तनिष्कचे दागिणे ५ टक्के डिस्काऊंटने खरेदी करू शकता.