Dhanteras 2022: धनत्रयोदशीला हे छोटे काम करा, लक्ष्मीची होईल कृपा; आजार-क्लेशातून व्हा मुक्त
Dhanteras 2022 Puja: दिवाळीला काही दिवस उरले आहेत. त्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होईल. या दिवशी छोटी-मोठी कामे केल्याने देवी लक्ष्मी घरात येते आणि लोक रोग आणि संकटांपासून दूर राहतात.
Dhanteras 2022 Remedy: धनत्रयोदशीच्या दिवसापासून पाच दिवसांचा दीपोत्सव सुरु होतो. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवसापासून रोग, दोष, त्रास यापासून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मीची उपासना सुरु होते. कौटुंबिक कलह, दारिद्र्य, अडथळे यापासून मुक्ती मिळवायची असेल, तसेच आरोग्य, सुख, शांती आणि लक्ष्मीचा ओघ यायचा असेल, तर यावेळी येणारे सण वाया जाऊ देऊ नका आणि छोटे छोटे उपाय करा.
यमराजाला प्रसन्न करा
धनत्रयोदशीच्या दिवसाला यमाचा दिवस देखील म्हणतात. म्हणून या दिवशी यमाला प्रसन्न केल्याने वर्षभर कुटुंबात सुख-शांती राहते. हा दिवस देखील महत्वाचा आहे, कारण हा दिवस आरोग्याच्या देवता धन्वंतरीचा जन्मदिवस देखील आहे, जो लोकांना निरोगी राहण्याचे वरदान देतो. यम पाण्याच्या तीरावर राहतो आणि भगवान धन्वंतरी देखील समुद्रमंथनाच्यावेळी पाण्यातून प्रकट झाले. त्यामुळे या दिवशी जलपूजन आणि दिवा लावावा, ज्यामुळे दोन्ही देव प्रसन्न राहतात.
हे करा उपाय
घरात अशांतता असेल, सासू-सासरे, वडील-मुलगा, नवरा-बायको, कोणत्याही प्रकारचा कलह असेल, मूल होण्यात अडथळा असेल किंवा मूल चुकीच्या मार्गावर गेले असेल, मुलगा-मुलगीच्या लग्नात समस्या असतील किंवा तुम्ही स्वत: काही गैरप्रकारांमुळे त्रासलेले असाल, कुटुंबातील सदस्यांना असाध्य रोग झाला असेल, व्यवसायात भरभराट होत नसेल किंवा नोकरीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर हे उपाय करावेत.
नोकरीमध्ये बराच काळ पदोन्नती थांबलेली असेल, पितृदोष किंवा ग्रहदुखीमुळे त्रास होत असेल किंवा राहू आणि शनीच्या त्रासामुळे त्रास होत असेल, तर धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवतेची मनोभावे पूजा करावी. ज्यांना कोणताही त्रास होत नाही, त्यांनीही धनत्रयोदशीच्या दिवशी जल पूजा करुन दिवा दान करावा. हे काम तुम्ही कोणत्याही कालव्याच्या किंवा नदीच्या काठावर करु शकता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)