मुंबई : यावर्षी 24 ऑक्टोबरला दिवाळीचा सण साजरा होणार आहे. दिवाळी सोबतच हा दिवस नरक चतुर्दशी देखील आहे. दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला साजरी केली जाते. या दिवशी भगवान राम लंका जिंकल्यानंतर अयोध्येला आले होते, असं मानलं जातं. शिवाय या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाल्याचं अनेकांकडून म्हटलं जातं. त्यामुळे दिवाळीत लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीत लक्ष्मीसोबतच गणेश, कुबेर आणि माता सरस्वती यांचीही पूजा केली जाते. दिवाळीच्या सणानिमित्तर बरेत जणं घरी लक्ष्मीचा नवीन फोटो किंवा मूर्ती पूजेसाठी आणतात. पण तुम्हाला माहित आहे का की, तुम्ही घरात माता लक्ष्मीची कोणती मूर्ती किंवा फोटो आणला पाहिजे? चला तर मग दिवाळीच्या मुहूर्तावर जाणून घेऊया घरात कोणत्या प्रकारच्या लक्ष्मीची मूर्ती असली पाहिजे.


वास्तू शास्त्रानुसार घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो नेहमी आशीर्वादाच्या स्थितीत असला पाहिजे ठेवावा. घरामध्ये असा फोटो असल्यास सकारात्मक ऊर्जा येते. तुम्ही घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्र फोटोही लावू शकता. 


  • माता लक्ष्मीचे असे फोटो किंवा मूर्ती घरात आणू नये

  • देवी लक्ष्मीचे वाहन घुबड असून ते चंचल स्वभावाचे आहे. त्यामुळे लक्ष्मीची मूर्ती कधीही घुबडावर बसलेल्या स्थितीत ठेवू नये.

  • माता लक्ष्मीची मूर्ती कधीही भिंतीला लागच्या बाजूला ठेवू नये. मूर्ती आणि भिंत यामध्ये अंतर ठेवणं गरजेचं आहे.

  • माता लक्ष्मीचा असा फोटो घरात लावू नये ज्यामध्ये तिचं रूप उग्र असेल. माता लक्ष्मीचा असा फोटो घरात लावणं अशुभ मानलं जातं.

  • दिवाळीची पूजा करताना लक्ष्मीची मूर्ती उभ्या स्थितीत ठेवू नका. माता लक्ष्मीच्या अशा रूपाची पूजा केल्याने फळ मिळत नाही. 

  • वास्तूनुसार देवी लक्ष्मीची मूर्ती नेहमी उत्तर दिशेला ठेवली पाहिजे. 


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)