Vasubaras 2023 : प्रकाशाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी... प्रत्येकाला हवा हवासा वाटणारा हा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जातो. गुरुवार 9 नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होणार आहे. गाई वासरांची दिवाळी म्हणजे वसुबारसने पहिली पणती घरोघरी लागणार आहे.  पंचांगानुसार आश्विन कृष्ण पक्ष एकादशी म्हणजे रमा एकादशीला वसुबारस आहे. यादिवशी गोवत्स द्वादशी असणार आहे. या दिवशी गाय वासराची पूजा करण्यात येते. घरच्या घरी वसुबारस कशी साजरा करणार जाणून घ्या. (diwali 2023 vasubaras 2023 govatsa dwadashi 9 November vasubaras muhurat history significance and importance puja vidhi video )


काय आहे वसुबारसची प्रथा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दिवाळी हा पहिला सण समुद्रमंथन या पौराणिक प्रसंगाशी संबंधित आहे. असं म्हणतात समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. कामधेनू हे मातृत्व, प्रजनन, देवत्व आणि पालनपोषण यांच्या आशीर्वादांशी संबंध जोडला आहे. दैवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली अशी मान्यता आहे. भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवताराशीही त्याचा संबंध आहे. 


वसुबारस पूजा मुहूर्त (vasubaras 2023 muhurat)


पोळाला बैलाची पूजा करण्याची गावोगावी परंपरा आहे. तशीच वसुबारसला गाय वासरुची पूजा केली जाते. वसुबारसच्या दिवशी सायंकाळी गाईची आणि वासराची पूजा केली जाते. लक्ष्मी देवीचं आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाय-वासराची पूजा करण्यात येते. गोवत्स द्वादशीचा मुहूर्त हा सायंकाळी 05.31 मिनिटे ते 08.09 मिनिटांपर्यंत आहे. 


अशी करा वसुबारसची पूजा


हा सण माय लेकाच्या नात्याची पूजा म्हणून पाहिली जाते. म्हणून काही ठिकाणी स्त्रियांचा या दिवशी मुलांसाठी उपवास करतात. वसुबारला घरासमोर रांगोळी काढा. घरातील गाय वासरू यांना आंघोळ घाला. शहरात घरात गाय वासराची मूर्ती असेल त्याची पूजा करा. अभिषेक करुन नवी वस्त्रं घाला. ह्या दिवशी हिंदू परंपरेनुसार, गहू, मूग खाले जात नाही. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून वसुबारसची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात पणत्या लावून रोषणाई करा. 


वसुबारस पूजा विधी व्हिडीओ 



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)