मुंबई : दिवाळीचा जल्लोष देशभरात सुरू झाला आहे. पाच दिवस चालणा-या दिव्यांच्या महोत्सवासाठी नागरिकांमध्ये आनंद दिसतो आहे. हिंदू संस्कृतीत दिवाळी या सणाला मोठे महत्व.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू परंपरेनुसार सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीचाच उल्लेख होतो. या सणाच्या निमित्ताने असंख्य दिव्यांनी आंगण घर उजळून निघते म्हणून या सणाला दीपावली असं म्हटलं जातं. लहान थोरांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात असतो. यांदाची दिवाळी ही १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. १७ तारखेला धनत्रयोदही साजरी केली जाईल. तर यम चतुदर्शी १८ ऑक्टोबर आहे.


लक्ष्मीपूजन १९ ऑक्टोबरला केले जाईल तर २० तारखेला गोवर्धन पूजा केली जाईल. त्यानंतर २१ ऑक्टोबरला देशभरात भाऊबीज साजरी केली जाईल. दिवाळीच्या दिवशी यश, किर्ती आणि धनलाभाची कामना करत महालक्ष्मीची पूजा केली जाते. असे म्हणतात की, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लक्ष्मीसोबतच भगवान गणेश, विष्णू आणि कुबेराची पूजा करावी. 


यंदा दिवाळी १९ ऑक्टोबरला गुरूवारी आली आहे. या दिवशी महालक्ष्मीच्या पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी सायंकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंत असेल. या वेळेत सर्वजण लक्ष्मीचं पूजन आणि विधी करु शकता.