आर्थिक तंगी दूर करण्यासाठी सोमवारी करा या फुलाचा उपाय, नोटांनी भरेल तिजोरी !
Monday Upay: तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत आहात का? आर्थिक संकटावर मात करायची असेल तर एक उपाय करा आणि तुमची तिजोरी नोटांनी भरा. त्यासाठी सोमवारी तुम्हाला एक उपाय करावा लागणार आहे. त्यामुळे कधीही आर्थिक संकट जवळही फिरकणार नाही. अपराजिता फुलाचा एक उपाय करणे गरजेचे आहे.
Aparajita Flower Upay For Money : अनेकांना नेहमी पैशाची चिंता असते. पैसा हाती नसेल तर अनेक जण बैचन होतात. तसेच आर्थिक संकट वारंवार येत असेल तर चिंतेत अधिक भर पडते. मात्र, अपराजिता फूल तुमचे आर्थिक संकट दूर करेल. पैसा मिळविण्यासाठी लाल किताब आणि ज्योतिषात उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये अपराजिताच्या निळ्या फुलांचा टोटका (उपाय) जलद पैसे देण्यास मदत करतो. सोमवारी अपराजिताचे उपाय केल्यास खूप फायदा होईल. सोमवारी या फुलांचा टोटका अर्थात उपाय केला तर तुमच्या पैशाची तिजोरी भरुन जाईल नोटांची बरकत होईल. त्यामुळे यापुढे कधीही आर्थिक संकट येणार नाही.
जीवनात खूप सुख-समृद्धी येते
अपराजिता फूलच्या उपायामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होते. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी याचा उपाय फायदेशीर ठरतो. तुळशीशिवाय इतर अनेक झाडे आणि वनस्पतींना हिंदू धर्मात महत्त्व दिले गेले आहे. या झाडांची आणि वनस्पतींची विशेष प्रसंगी आणि सणांना पूजा केली जाते. त्याचप्रमाणे झाडे-वनस्पतींबरोबरच देवदेवतांना प्रिय असलेली फुले असतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी संबंधित फुले अर्पण केली जातात. यात तुम्ही अपराजिताची फुले देवाला अर्पण करु शकता. अपराजिताची फुले भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना अतिशय प्रिय आहेत. अपराजिताचे झाड घरात लावल्यास किंवा भगवान श्री हरी कृष्ण आणि भोलेनाथ यांना अपराजिताची फुले अर्पण केल्यास जीवनात खूप सुख-समृद्धी येते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात अपराजिताच्या निळ्या फुलांचे टोटके आणि उपाय खूप प्रभावी असल्याचे सांगितले आहे.
अपराजिता फुलांचा हा उपाय
तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. नेहमी चिंता राहते. खूप प्रयत्न करुनही तुम्हाला पुरेसे पैसे मिळत नसतील, आर्थिक संकट तुमची साथ सोडत नसेल तर सोमवारी अपराजिताच्या फुलाचा हा उपाय करा. यासाठी सोमवारी उपवास करुन शिवलिंगाची पूजा करुन अपराजिताची फुले अर्पण करा. यासोबतच रुद्राक्षाच्या मापाने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. त्यानंतर अपराजिताचे फूल उचलून धनाच्या ठिकाणी ठेवावे. तुमच्या आयुष्यात पैशाचा ओघ झपाट्याने वाढेल.
यामुळे नक्कीच यश मिळते
एखाद्याला नोकरी मिळत नसेल तर त्यांनीही हा उपाय केला तर त्यांनी नोकरीची संधी मिळते. जर तुम्ही नोकरीसाठी मुलाखत देणार असाल किंवा काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर एक दिवस आधी अपराजिताची 5 फुले आणि तुरटीचे 5 छोटे तुकडे घेऊन हातात घ्या आणि तुमच्या आराध्य दैवताचे धान्य करा. यावेळी यश मिळवण्यासाठी प्रार्थना करा. मग ही फुले आणि तुरटी तुमच्या पर्समध्ये ठेवा आणि जा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
तसेच गुरुवारी किंवा शुक्रवारी घरात अपराजिताचे रोप लावा. तसेच गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करुन त्यांना अपराजिताचे फूल अर्पण करावे. यासोबत सोमवारी किंवा शनिवारी अपराजिताची फुले वाहत्या पाण्यात सोडावीत. यामुळे कुंडलीतील अनेक ग्रह दोष दूर होतील आणि तुम्हाला भरपूर संपत्ती मिळेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)