Shani Rekha in Hand: भविष्य वर्तवण्याचे अनेक प्रकार आहेत. जन्मदिनांक आणि जन्मवेळ यावरून ग्रहांची स्थिती आणि भाकीत वर्तवलं जातं. दुसरीकडे हातावरील रेषांवरून भविष्य सांगितलं जातं. हातावरील रेषा, निशाण, चिन्ह यावरून जीवन कसं असेल याबाबत अंदाज वर्तवला जातो. आर्थिक स्थिती, पद-प्रतिष्ठा, वैवाहिक जीवन याबाबत सांगितलं जातं. कित्येकदा कठोर मेहनत करूनही अपेक्षित फळ मिळत नाही. अशावेळी नशिबाला दोष देत माणूस आपला रहाटगाडा पुढे हाकत राहतो. मेहनतीला यश कधी मिळेल? या दृष्टीकोनातून भविष्याबाबत रुची निर्माण होते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे हस्तरेखाशास्त्रात शनिला विशेष महत्त्व दिलं जातं. हातावर शनिरेषा आणि शनिपर्वत असल्यास ती व्यक्ती भाग्यवान समजली जाते. चला जाणून घेऊयात शनि रेषेबाबत...


शनिरेषा प्रत्येकाच्या हातावर असते असं नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हस्तरेषाशास्त्रानुसार तळहाताच्या मधोमध एक उभी रेषा असते. त्या रेषेला शनिरेषा म्हंटलं जातं. शनिरेषा मणिबंधातून शनि पर्वतापर्यंत जाते. शनिपर्वत हे मधल्या बोटाच्या तळाशी असते. पण शनि रेषा किंवा भाग्य रेषा सर्वांच्या हाती असतेच असं नाही. मात्र ज्या व्यक्तींच्या तळहातावर रेषा असते त्यांना भाग्याची साथ मिळते. 


बातमी वाचा- Supari Upay: सुपारी तोडग्यामुळे गणपती बाप्पा होणार प्रसन्न, जाणून ज्योतिषशास्त्रीय उपाय


शनिरेषेची स्थिती कशी असावी


  • ज्या व्यक्तींच्या मणिबंधापासून शनि पर्वतापर्यंत शनिरेषा जात असेल तर अशा व्यक्ती कमी वयातच खूप पैसा कमवतात. जातकांना आपल्या मेहनतीचं फळ मिळतं.

  • जर शनी रेषा तुटकतुटक जीवनरेषेपासून शनि पर्वतावर गेली असेल तर अशी रेषाही खूप शुभ असते. अशा लोकांना त्यांच्या आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात यश मिळते आणि उच्च स्थान प्राप्त होते.

  • गुरु पर्वतापासून शनि पर्वतापर्यंत एखादी रेषा जात असेल तर असे लोक खूप भाग्यवान असतात. अशा लोकांना भरपूर यश मिळते आणि भरपूर पैसाही मिळतो. त्यांना पैशाची कधीच कमतरता नसते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)